शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आकर्षक पॅकेजिंगचे करियर, अनुभवी डिझायनरला मिळतो भरघोस पगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 10:49 IST

पॅकेजिंग म्हणजे काय, हे जाणून घेतले, तर प्रथमदर्शनी आपल्या लक्षात येईल की, बाजारातील कोणत्याही वस्तूच्या भोवती गुंडाळलेले वेष्टन किंवा आकर्षक आवरण.

गेल्या काही वर्षांत पॅकेजिंग क्षेत्राचे महत्त्व अधिक वाढले आहे. जाहिरात क्षेत्रात एखाद्या उत्पादनाचा विचार करताना पॅकेजिंगविषयी विचार करण्यासाठी क्रिएटिव्ह टीम असते. ही टीम पॅकेजिंगबाबत ग्राहक, व्यावसायिक, वितरण, विपणन अशा सर्व बाजूंनी विचार करीत असते. त्यामुळे एखाद्या उत्पादनाच्या पॅकेंजिगचा भावही वधारला आहे, त्यामुळे आता पॅकेजिंग क्षेत्रात प्रावीण्य मिळविण्यासाठी करिअरची ही अनोखी वाट हटके पर्याय ठरू शकते.

पॅकेजिंग म्हणजे काय, हे जाणून घेतले, तर प्रथमदर्शनी आपल्या लक्षात येईल की, बाजारातील कोणत्याही वस्तूच्या भोवती गुंडाळलेले वेष्टन किंवा आकर्षक आवरण. सत्तरच्या दशकापर्यंत कोणत्याही वस्तूच्या विक्रीसाठी पॅकिंग म्हणून कोऱ्या कागदी पिशव्या किंवा वर्तमानपत्राचा वापर केला जात असे. हळूहळू कागदाऐवजी प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला. प्लास्टिक टिकाऊ आणि चमकदार असल्याने त्याच्यावर वस्तूचे नाव आणि कंपनीची जाहिरात करणे सुरू झाले. गेल्या ५० वर्षांत याचा इतका प्रसार आणि प्रचार झाला की, वस्तूच्या दर्जापेक्षा त्याच्या बाहेरील आवरण किती आकर्षक यावर त्याची विक्री किंवा मागणी ठरू लागली. पॅकेजिंग ही आता काळाची गरज आहे व त्यात संधीही विपुल प्रमाणात आहेत. तरुणांनी या संधीचे सोने करावे.

उत्तम पॅकेजिंगसाठी उत्तम प्रिंटिंग व आकर्षक डिझायनिंग, तसेच फोटो हे आवश्यक असतात. म्हणून छायाचित्रण, छपाई हे नवीन पॅकेजिंगला पूरक म्हणून करिअर आहे. प्लास्टिकचा वापर वाढल्याने प्लास्टिक टेक्नॉलॉजीचे शिक्षण घेतले, तर पॅकेजिंग क्षेत्रात त्याला खूप मागणी आहे. दुग्धजन्य पदार्थ, फूड प्रॉडक्टससाठी पॅकेजिंग महत्त्वाचे असल्याने डेअरी टेक्नॉलॉजीचा अभ्यासक्रम करणाऱ्यांना पॅकेजिंगमध्ये खूप संधी उपलब्ध आहेत. पॅकेजिंगचा कोर्स करून पेन व साहित्य (शालेय) व्यवसायात नोकरी किंवा व्यवसाय करू शकतो. 

वस्तूचे डिझाइन करण्यासाठी कंपन्या जाहिरात एजन्सीबरोबर करार करतात किंवा कंपन्या स्वत:च अशा कामासाठी डिझायनरची नेमणूक करतात. सध्या चांगल्या व अनुभवी डिझायनरला भरघोस पगार मिळतो. कंपन्यांमध्ये सध्या पॅकेजिंग डेव्हलपमेंट असा नवीन विभाग  असतो. तिथे संशोधन करीत आपले उत्पादन कसे कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त दर्जेदार व आकर्षक करता येईल यावर भर दिला जातो.

प्रिंटिंग टेक्नॉलॉजी हा तीन वर्षांचा डिप्लोमा कोर्स आहे. त्यात प्रिंटिंगचे सर्व प्रकार उदा. लेटर प्रेस ऑफसेट, रोटो ग्रॅवुअर, स्क्रीन प्रिंटिंग व डिजिटल प्रिंटिंग हे शिकविले जातात. यात पदविका व पदवी असे दोन्ही कोर्स दहावी किंवा बारावीनंतर आहेत. डिप्लोमा इन पॅकेजिंग हा कोर्स दोन वर्षे पूर्णवेळ व दीड वर्ष करस्पॉण्डन्स स्वरूपात उपलब्ध आहे. पूर्णवेळ अभ्यासक्रमासाठी विज्ञान पदवी व करस्पॉण्डन्स अभ्यासक्रमासाठी पाच वर्षे  नोकरीचा अनुभव हवा.