शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

खादीमुळे ९.४५ लाख नोकऱ्या; तरूणांना भुरळ, वृत्त निवेदकही दिसणार खादी कपड्यांत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 07:38 IST

खादी ग्रामोद्योग आयोगाचे (केव्हीआयसी) अध्यक्ष मनोजकुमार यांच्या उपस्थितीत दिल्लीतील कमानी ऑडिटोरियममध्ये या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या

नवी दिल्ली : स्वातंत्र्य लढ्याचा आत्मा राहिलेली खादी आजच्या तरुणांतही तेवढीच लोकप्रिय असून गेल्या वित्त वर्षात खादीची १.३४ लाख कोटी रुपयांची विक्री झाली आहे. तसेच ९.५४ लाख नोकऱ्याही खादी ग्रामोद्योगाने निर्माण केल्या आहेत. खादी उद्योगास आणखी गती देण्यासाठी सूक्ष्म, लघू व मध्यम उद्यम मंत्रालयाने ३ सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. 

खादी ग्रामोद्योग आयोगाचे (केव्हीआयसी) अध्यक्ष मनोजकुमार यांच्या उपस्थितीत दिल्लीतील कमानी ऑडिटोरियममध्ये या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यानिमित्ताने पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या लाभार्थींना १५० कोटी रुपयांच्या सबसिडीचे वितरण मनोजकुमार यांच्या हस्ते झाले. 

प्रसार भारती, डीआयसी यांच्यासोबत करार यातील एक करार प्रसार भारतीसोबत करण्यात आला. या करारान्वये डीडी न्यूज आणि डीडी इंटरनॅशनल चॅनलचे निवेदक खादीचे कपडे परिधान करतील. खादी आणखी लोकप्रिय करण्यात याचा उपयोग होईल. दुसरा करार ‘एनबीसीसी इंडिया लिमिटेड’सोबत करण्यात आला. या करारान्वये खादी ग्रामोद्योगासाठी पायाभूत सुविधा उभारण्याची जबाबदारी ‘एनबीसीसी’ला सोपविली. खादी ग्रामोद्योगास आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी ‘डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन’सोबत (डीआयसी) एक सामंजस्य करार करण्यात आला आहे.

पोर्टलचे विमोचनया तिन्ही करारामुळे खादी ग्रामोद्योगास मोठा लाभ होईल. प्रसार भारतीसोबतच्या करारामुळे खादीला तरुणांत लोकप्रियता मिळण्यास मदत होईल. यानिमित्ताने एका ‘एटीआर पोर्टल’चे विमोचनही करण्यात आले. त्याद्वारे आयोगाच्या विविध योजनांचे नियमन करणे सोपे होईल.