गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या गुप्तचर संस्थेत काम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी भारत सरकारने एक सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली. गुप्तचेर संस्थेत सुरक्षा सहाय्यक/कार्यकारी पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अर्ज प्रक्रिया २६ जुलैपासून सुरू होईल. अर्ज प्रक्रिया २६ जुलैपासून सुरू होईल. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट mha.gov.in किंवा ncs.gov.in या वेबसाईटवर भेट देऊन अर्ज करू शकतात.
या भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार दहावी उत्तीर्ण असले पाहिजेत. तसेच त्यांचे वय १८ ते २७ वर्षांच्या दरम्यान असावे. या भरती अंतर्गत देशभरातील तरुणांसाठी नोकरी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर, मुंबई आणि नागपूरसाठी अनुक्रमे २६६ आणि ३२ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटीची तारीख १७ ऑगस्ट २०२५ आहे. त्यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
शैक्षणिक पात्रताउमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून दहावी उत्तीर्ण केलेली असावी. उमेदवार ज्या राज्यासाठी अर्ज करणार आहे, त्याच्याकडे त्या राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
निवड प्रक्रियाया भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची तीन टप्प्यांची निवड केली जाईल. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गृह मंत्रालयाकडून एक दुरुस्ती विंडो उघडली जाईल ज्या अंतर्गत उमेदवार त्यांच्या फॉर्ममध्ये काही मर्यादित बदल करू शकतील. निवड झालेल्या उमेदवाराला दहमहा २१,७०० ते ६९१०० पर्यंत पगार दिला जाईल.