शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद सभापती निवडीतही महाविकास आघाडीची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 14:56 IST

२१ जानेवारी रोजी झालेल्या विषय समिती सभापती पदांच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीने आपला दबदबा कायम ठेवला आहे.

बुलडाणा: भाजपला धोबीपछाड देत जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदावर कब्जा करत महाविकास आघाडीने मिनी मंत्रालयात नवी इन्हींग सुरू केली असतानाच २१ जानेवारी रोजी झालेल्या विषय समिती सभापती पदांच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीने आपला दबदबा कायम ठेवला आहे. दरम्यान, पक्षादेश झुगारणाऱ्या शिवसेनेच्या एका जिल्हा परिषद सदस्याची शिवसेनेने पक्षातून हकालपट्टी केली आहे.विषय समिती सभापती पदांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये ठरलेल फॉर्म्युल्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थ व बांधकाम, काँग्रेसला महिला व बालकल्याण तर शिवसेनेला कृषी व पशुसंवर्धन समिती सभापतीपद देण्यात आले आहे. यासाठी मंगळवारी जिल्हा परिषदेच्या शिवाजी सभागृहामध्ये विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये काँग्रेसच्या ज्योती अशोक पडघान यांना महिला व बालकल्याण, शिवसेनेच्या राजेंद्र पळसकर यांच्याकडे कृषी व पशुसंवर्धन तर राष्ट्रवादी काँग्रेसचे रिजाय खाँ पठाण यांना अर्थ व बांधकाम सभापतीपद देण्यात आले. समाज कल्याण समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्याच पुनम राठोड यांची वर्णी लागली.जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षाची निवडणूक अविरोध झाली होती. त्याप्रमाणे विषय समिती सभापती पदांचीही निवडणूक अविरोध होईल, असे वाटत होते. मात्र भाजपतर्फे तिन्ही सभापती पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्याने शेवटी या पदांसाठी निवडणूक घेण्यात आली. समाज कल्याण समिती सभापती पदासाठी सरस्वती वाघ आणि पुनम राठोड यांनी अर्ज दाखल केले होते. त्यात पुनम राठोड विजयी झाल्या. त्यांना ३३ तर वाघ यांना २४ मते पडली. महिला व बालकल्याण समिती सभापती पदासाठी काँग्रेसकडून ज्योती पडघान व भाजपकडून रुपाली काळपांडे यांनी अर्ज दाखल केले होते. यात काळपांडे यांना २४ तर ज्योती पडघान यांना ३३ मते मिळाली. शिवसेनेकडून कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती पदासाठी राजेंद्र पळसकर यांनी तर विरोधी पक्षाकडून मालुताई मानकर यांनी अर्ज दाखल केला होता. त्यात पळसकर विजयी झाले. अर्थ व बांधकाम सभापती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे रियाज खाँ पठाण विजयी झाले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहूल बोंद्रे, लक्ष्मण घुमरे, शिवसेनेचे आ. संजय गायकवाड, जिल्हा शिवसेना प्रमुख जालिंदर बुधवत, काँग्रेसचे सुनील सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. नाझेर काझी प्रामुख्याने उपस्थित होते.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाBuldhana ZPबुलढाणा जिल्हा परिषद