शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सातपुड्यातील जैवविविधततेच्या संवर्धनाचा ‘तरूणाई’चा निर्धार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 15:54 IST

तीन दिवसीय राज्यस्तरीय संमेलनात हवामान बदल, जंगल आणि पाऊस या विषयावर गांधी नगर, गुजरात येथील डॉ. प्रवीण भस्मे यांनी मार्गदर्शन केले.

- अनिल गवई

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :   सातपुड्याच्या पर्वत रांगेतील जैव विविधततेचे संवर्धन करण्याचा निर्धार ‘तरूणाई’ने केला. राज्यातील १८ जिल्ह्यातील तरूणाईने ‘आपना सातपुडा’ या राज्यस्तरीय जैवविविधता शिबिरात पर्यावरण रक्षणासोबतच जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी विविध ठरात संमत केले. निमित्त होते ते तरूणाई फांउडेशन, खामगाव आणि महात्मा गांधी लोकसेवा संघाच्यावतीने  जळगाव जामोद तालुक्यातील सालईबन येथे आयोजित तीन दिवसीय ‘आपना सातपुडा’ राज्यस्तरीय जैवविविधता शिबिराचे. या शिबिराच्या उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी जळगाव जामोद वनपरिक्षेत्र अधिकारी खान होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून कुमार शिराळकर होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून वनपरिक्षेत्र अधिकारी के.डी.पडोळ, साहित्यिक नरेंद्र लांजेवार, सरपंच विजया पुंडलिक पाटील, तरूणाईचे मनजीतसिंह शिख, डॉ. धीरज देशमुख, डॉ. नेहा काळे, उमेश खाडे, डॉ. प्रवीण भस्मे यांची उपस्थिती होती.  संचालन प्रताप मारोडे यांनी केले. आभार उमाकांत कांडेकर यांनी मानले.

पर्यावरणासंबंधीत विविध विषयांवर चर्चासत्र!तीन दिवसीय राज्यस्तरीय संमेलनात हवामान बदल, जंगल आणि पाऊस या विषयावर गांधी नगर, गुजरात येथील डॉ. प्रवीण भस्मे यांनी मार्गदर्शन केले. नाशिक येथील डॉ निलिमा जोरवार यांनी रानभाज्या, नैसर्गिक वनस्पती आणि  मिलेटबाबत (देवधान्य) माहिती दिली.  अमरावती येथील दिशा वाईल्ड लाईफचे यादव तरटे यांनी जैव विविधता: प्राणी- पक्षी आणि झाडांबाबत आणि हवामान बदलाबाबत मुंबई येथील डॉ. निधीन आणि डॉ. सेजल तांबट  यांनी मार्गदर्शन केले. तर वनऔषधींबाबत सुरेश टाकर्डे यांनी सखोल मार्गदर्शन केले. १८ जिल्ह्यातील तरुणांचा सहभाग!बुलडाणा जिल्ह्यातील सालईबन येथे पार पडलेल्या जैवविविधता शिबिरात महाराष्ट्रातील अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, परभणी, नागपूर, बीड, अहमदनगर, जालना, धुळे, नंदुरबार, जळगाव खांदेश, सातारा, पुणे, अकोला, वाशीम, बुलडाणा आणि पालघर जिल्ह्यातील तरूणांचा समावेश होता.

टॅग्स :khamgaonखामगाव