खामगाव : नुकत्याच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहे. अल्पसंख्याकांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याच्या उद्देशाने स्थापन (मॉयनॉरिटी डिमॉक्रॉटिक पार्टी) एमडीपी हा राजकीय पक्षदेखील बुलडाणा जिल्हय़ातील विधानसभा मतदारसंघामध्ये आपले उमेदवार उभे करणार असल्याचे पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. पक्षाचे जिल्हा प्रभारी मो. हसन अ. खालीक इमानदान यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये जाहीर केले आहे की, पक्षातर्फे बुलडाणा जिल्हय़ातील सर्वच विधानसभा म तदारसंघामध्ये ते उमेदवार उभे करणार असून, अल्पसंख्यांक समाजाचा विकास हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट राहील. तसेच त्यांचे सर्वच उमेदवार हे आप-आपल्या मतदारसंघात प्रस्थापितांना चांगल्या प्रकारे टक्कर देतील, असेही त्यांनी नमूद केले आहे.
एमडीपी उतरविणार आपले उमेदवार
By admin | Updated: September 15, 2014 00:56 IST