शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

युवकाची दगडाने ठेचून निघृण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 13:48 IST

शेगाव : शहरालगतच्या जानोरी रेल्वेगेटजवळ एका ३० वर्षीय युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : शहरालगतच्या जानोरी रेल्वेगेटजवळ एका ३० वर्षीय युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.रेल्वे कर्मचाऱ्यांना जानोरी गेटजवळ एका युवकाचे प्रेत रस्त्यावर पडून असल्याचे आढळून आले. ही माहिती शहर पोलीसांना मिळाल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळ गाठले. राजेश उर्फ गणेश गजानन बोदडे (रा.मंदिर परिसर, शेगाव) याचा हा मृतदेह असल्याचे तपासात समोर आले. मृतकाचा चेहरा छिन्नविछीन्न अवस्थेत आढळून आल्याने मृतक युवकाची दगडाने ठेचून हत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचा अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे. मृतक हा मागील तीन दिवसांपासून घरून बेपत्ता होता असे नातेवाईकांनी सांगितले. त्यानंतर पोलीसांनी मृतकाचे प्रेत उत्तरीय तपासणीसाठी स्थानिक सईबाई मोटे शासकीय उपजिल्हा रूग्णालयात पाठवले आहे. प्रकरणी मृतकाचा मावसा संतोष प्रल्हाद तायडे (रा. काँग्रेसनगर शेगाव) यांनी पोलिसात तक्रार दिली असून अज्ञात व्यक्ती विरोदात शेगाव शहर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.मृतक खूनाच्या गुन्हयाच्या आरोपीया घटनेतील मृतक राजेश बोदडे हा एका वृध्दाच्या खूनाच्या घटनेतील आरोपी असून तो जेलमधून जामीनावर सुटून आलेला होता, अशी माहिती मिळाली आहे. १६ आॅगस्ट २०१६ रोजी सायंकाळच्या सुमारास मृतक व त्याचा सहकारी रूपेश याने मंदिर रोडवरील फुटपाथवर एका वृध्द भिकाºयाला बेदम मारहाण करून त्याची हत्या केली होती. सदरहु घटनेचे चित्रिकरण भवानी पार्किंगच्या कॅमेºयात रेकॉर्ड झाले होते. त्यानंतर काही वेळातच पोलीसांनी मृतक राजेश व त्याचा मित्र रूपेश याला बेड्या ठोकल्या होत्या. यावरून हल्ली मृतक राजेश हा जमातीवर जेलमधून बाहेर आलेला असतांना आज सकाळी त्याची हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारीMurderखून