ढालसावंगी(जि. बुलडाणा), दि. ११- येथील गावातील युवकाने गावातीलच एका युवकावर चाकू मारुन जखमी केल्याची घटना १0 मार्च रोजी सायंकाळी ७:३0 वाजताच्या दरम्यान घडली. ढालसावंगी येथील वार्ड नं.२ मधील रहिवाशी पंढरी मधुकर मान्टे वय २0 याने याच्याच घराजवळ वार्ड नं १ मधील रहिवाशी अंकुश सुधाकर जाधव वय २0 याला डाव्या बाजूला बरगाडीत चाकू मारुन जखमी केले.अंकुशच्या आई-वडिलांनी धाड पोलीस स्टेशनला माहिती देऊन धाड येथे शासकीय रुग्णालयात उपचार करून आरोपी पंढरी मधुकर मान्टे यांच्यावर धाड पोलिसानी कलम ३२४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
चाकू हल्ल्यात युवक जखमी
By admin | Updated: March 12, 2017 02:05 IST