शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

खामगावातील युवक-युवतीची बाळापुरात आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 10:25 IST

दोघांचे मृतदेह नदीच्या पुलाखाली तरंगतांना दिसले.

ठळक मुद्देयुवकाच्या खिशात चिठ्ठी आढळून आली आहे.युवती अल्पवयीन असल्याची माहिती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव/बाळापुर : खामगावातील युवक-युवतीने बाळापुरातील  नदीच्या पुलावरून नदीच्या पात्रात उडी घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. माहिती मिळताच पोलिसांनी त्यांचे मृतदेह बाहेर काढत शवविच्छेदनासाठी अकोला येथील सर्वोपचार रूग्णालयात पाठविले.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर असलेल्या मन नदी पुलावरून युवक-युवतीने उडी घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या दोघांचे मृतदेह नदीच्या पुलाखाली तरंगतांना दिसले. त्यामध्ये युवती अल्पवयीन असल्याची माहिती आहे. तर युवकाच्या खिशात चिठ्ठी आढळून आली आहे. खामगावातील सुटाळा बु. येथील शिवाजी नगरातील अक्षय अशोक घरत (वय-२०) हा गेल्या दोन दिवसापासून बेपत्ता होता. तो आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. यापूर्वी त्याच्या वडिलांनीही आत्महत्या केली होती. बेपत्ता असल्याने त्याच्या नातेवाईकाकडून शोध घेण्यात आला होता. त्याची प्रेयसी ही खामगाव परिसरातील रहिवासी आहे.त्या दोघांनीही नदीत उडी घेत आत्महत्या केली. पोलीसांनी दोघांचे मोबाईल ताब्यात घेतले. दरम्यान रात्री उशिरा मिळालेल्या माहितीनुसार घटनेतील मुलगी लोणार तालुक्यातील धाबा येथील कोमल राजू बाजड (वय १७) असून ती सध्या अकोला मुक्कामी असल्याचे समजते.

टॅग्स :khamgaonखामगावBalapurबाळापूरSuicideआत्महत्या