शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

दीडशे रुपयांसाठी काढावे लागते हजार रुपयांचे बँक खाते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 12:05 IST

Buldhana News : विद्यार्थ्यांना राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये खाते काढण्यास सांगण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : उन्हाळी सुटीतील शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष न देता त्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये खाते काढण्यास सांगण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना दीडशे रुपयांसाठी बॅंक खाते काढताना चक्क एक हजार रुपये माेजावे लागत आहेत.  शालेय विद्यार्थ्यांना दरदिवशी पोषण आहार वाटप केला जातो. मात्र, कोरोनामुळे यंदा शाळा भरल्या नाहीत. त्यामुळे आहार न शिजवता धान्य वाटप करण्यात आले. आता तर धान्यही न देता पोषण आहाराचे पैसेच थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे. उन्हाळ्यात शाळांना सुटी असली, तरी सुटीच्या  कालावधीतही पोषण आहार वाटप करणे बंधनकारक आहे. यंदा शाळा बंद असल्याने काही काळ आहाराऐवजी धान्य वाटप करण्यात आले. उन्हाळ्यात धान्य वाटपही शक्‍य न झाल्याने  या आहाराचे थेट पैसेच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात टाकले जाणार आहेत. त्यासाठी मुलांना बँक खाते काढण्यासाठी एक हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागत आहे.

शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत उन्हाळी सुटीच्या कालावधीतील लाभ थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्याचे नियोजन सुरू आहे. - सचिन जगताप, प्राथमिक शिक्षणाधिकारी, बुलडाणा.  

टॅग्स :buldhanaबुलडाणाbankबँक