शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
6
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
7
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
8
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
9
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
10
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
11
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
12
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
13
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
14
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
15
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
16
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
17
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
18
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
19
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
20
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...

सरते वर्ष शेतकर्‍यांसाठी सर्वच घडामोडीत नुकसानाचा न संपणारा हंगाम ठरले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 01:21 IST

बुलडाणा : २0१७ या वर्षाच्या सुरुवातीलाच नोटाबंदीच्या नावाखाली कृषी उत्पन्न बाजार समि तीच्या बंदचा फटका शेतकर्‍यांना बसला. नाफेडच्या गोंधळामुळे तूर विक्रीत अडचणी, सोयाबीनला  लांबलेल्या पावसाचा फटका, शेतमालाचे पडलेले भाव आणि सरत्या वर्षात कपाशीवरील  बोंडअळीचा प्रादुर्भाव व कर्जमाफीचे न सुटलेले गणित या सर्वच घडामोडीत सरते वर्ष शे तकर्‍यांसाठी नुकसानाचा न संपणारा हंगाम ठरले. 

ठळक मुद्देनाफेडच्या गोंधळामुळे तूर विक्रीत अडचणी, सोयाबीनला लांबलेल्या पावसाचा फटकाशेतमालाचे पडलेले भाव आणि कपाशीवरील बोंडअळीचा प्रादुर्भाव कर्जमाफीचे न सुटलेले गणित व महिको कंपनीविरुद्ध गुन्हे

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : २0१७ या वर्षाच्या सुरुवातीलाच नोटाबंदीच्या नावाखाली कृषी उत्पन्न बाजार समि तीच्या बंदचा फटका शेतकर्‍यांना बसला. नाफेडच्या गोंधळामुळे तूर विक्रीत अडचणी, सोयाबीनला  लांबलेल्या पावसाचा फटका, शेतमालाचे पडलेले भाव आणि सरत्या वर्षात कपाशीवरील  बोंडअळीचा प्रादुर्भाव व कर्जमाफीचे न सुटलेले गणित या सर्वच घडामोडीत सरते वर्ष शे तकर्‍यांसाठी नुकसानाचा न संपणारा हंगाम ठरले. २0१६ हे वर्ष नोटाबंदी लावून गेले; मात्र २0१७ या वर्षाची सुरुवात शेतकर्‍यांना नोटाबंदीचा फटका  खातच करावी लागली. पदोपदी शेतकरीच नोटाबंदीमुळे अडचणीत सापडले. यात कृषी उत्पन्न  बाजार समित्याही बंद ठेवण्यात आल्या. त्यामुळे शेतमाल विक्री करणे शेतकर्‍यांसाठी अवघड झाले  होते. त्यानंतर तूर विक्रीसाठी मोठा आटापिटा शेतकर्‍यांना करावा लागला.  जिल्ह्यात नाफेड  केंद्रावर  पंचनामा झालेल्याच तुरीची खरेदी सुरू करण्यात आली होती. त्यामुळे मध्यंतरी १ लाख २  हजार पोते तूर  जिल्हाभरातील नाफेड केंद्रासमोर खरेदी बाकी होती. त्यामुळे  तूर विक्री  करण्यासाठी जिल्ह्यात कृउबासच्या काही संचालकांकडून सेटिंग लावल्याचा प्रकारही घडला.   संचालकांनी तूर विक्रीसाठी आपल्या नातेवाइकांचे सातबारेसुद्धा घेऊन ठेवल्याने जिल्ह्यात तूर  खरेदीचे मोठे गौडबंगाल पहावयास मिळाले. मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर चांगला पाऊस झाल्याने बहु तांश शेतकर्‍यांनी मृग नक्षत्राच्या पहिल्याच आठवड्यात खरीप हंगामाची पेरणी उरकली होती.  पाऊस लांबल्याने अनेक शेतकर्‍यांना मूग, उडीद व सोयाबीनचे नुकसान झाले. त्यानंतर काहींनी  दुबार पेरणी करून सोयाबीनचे पीक घेतले; मात्र त्यातही सोयाबीनला शेंगाच न आल्याचा प्रकार  मेहकर, लोणार, सिंदखेड राजा व देऊळगाव राजा तालुक्यात घडला. पीक नुकसानावर शे तकर्‍यांना मदत व्हावी, यासाठी पीक विमा हप्ता सीएससीमार्फत ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यास  यावर्षी पहिलाच प्रयोग करण्यात आला; मात्र ऑनलाइनची ही प्रक्रिया वारंवार विस्कळीत झाल्याने  जिल्ह्यात ऑनलाइन पीक विम्याचा पहिलाच प्रयोग फेल गेला. जिल्ह्यात कांदा चाळीच्या उद्दिष्टातही यावर्षी खामगाव तालुका अव्वल ठरला. जिल्ह्यात सोयाबीन  सोंगणीचा हंगाम सुरू असताना परतीच्या पावसाने अनेकांच्या सोयाबीनचे नुकसान झाले.  भिजलेल्या सोयाबीनचा दर्जा ढासाळल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला भाव  मिळाला नाही. परिणामी, शेतकर्‍यांना मातीमोल भावात सोयाबीन विक्री करावी लागली. शेतमालाचे  भाव पडल्यामुळे शेतकर्‍यांना यावर्षी रस्त्यावर उतरावे लागले, तसेच शेतकर्‍यांवर संप पुकारण्याची  वेळही आली, तसेच कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. बोंडअळीमुळे कपाशीच्या  नुकसानाचे प्रमाण येवढे वाढले की,  बुलडाणा जिल्ह्याच्या बोंडअळीचा प्रश्न हिवाळी अधिवेशना तही गाजला. जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे सूक्ष्म सिंचनाचे अनुदान थकले असून, हा सिंचनाचा प्रश्न  यावर्षीच्या अधिवेशनात रंगला. त्यानंतर बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना मदतीसाठी  विनवणी करावी लागली. आता सरत्या वर्षात नुकसानावर मदत जाहीर झाली; मात्र नुकसानाचा  पंचनामा संपता संपत नसल्याचे दिसून येत आहे.   

महिको कंपनीविरुद्ध गुन्हेबीटी कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊन शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. बोंडअळीला कारणीभूत  असणार्‍या बाबींचा शोध घेणे सुरु असताना धानोरा फाट्यानजिक असलेल्या महिको कंपनीच्या बियाणे साठवण प्रक्रिया व पॅकींग युनिटवर पोलीस पथकाने धाड टाकून बियाणे ठेवलेले सहा गोडाउन सील केले होते. चौकशीनंतर २0 डिसेंबरला बियाणे क्षेत्रातील देशातील नामांकित  महाराष्ट्र हायब्रीड सीडस् कंपनी (महिको) वर गुन्हे दाखल झाले.

जिल्ह्यात धान्य महोत्सवशेतकर्‍यांना स्वत:च्या मालाचा भाव स्वत:च ठरवून विक्री करण्यासाठी तसेच त्यांच्या उत्पादनांना सहजपणे चांगला भाव व बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी धान्य महोत्सव हा उपक्रम शेतकर्‍यांसाठी उपयुक्त आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या धान्य महोत्सवाचे आयोजन बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात ३ जूनला मोठय़ा थाटामाटात करण्यात आले होते; परंतु शेतकरी संपाचा परिणाम महोत्सवावर जाणवला.

दूध उत्पादन प्रकल्प उभारणीत जिल्ह्याचा समावेशदूध उत्पादनवाढीसाठी विदर्भ व मराठवाड्यातील १0 जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाकडून विशेष प्रकल्प उभारणी करण्यात आली आहे.  जिल्ह्यात सुरू असलेल्या २१ सहकारी दूध संस्थांमध्ये सरासरी ६ हजार ३६१  प्रति. दिन लिटर दूध गोळा गेले जाते. या प्रकल्पामध्ये बुलडाणा जिल्ह्याचा समावेश करण्यात आला. 

टॅग्स :buldhanaबुलडाणा