शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

वाडी खुर्द येथील रेशन दुकानावर धाड

By admin | Updated: April 2, 2017 01:41 IST

१ लाख ६१ हजार २३0 रुपयांचा माल जप्त केला.

जळगाव जामोद, दि. १- येथील वाडी खुर्द भागातील स्वस्त धान्य दुकानावर ३१ मार्चचे रात्री स्थानिक गुन्हे शाखा बुलडाणाच्या पथकाने धाड टाकून ८ हजार निळ्या रॉकेलसह १ लाख ६१ हजार २३0 रुपयांचा माल जप्त केला. व दुकान मालक सुनीता गजानन वघ रा. माळीखेळ जळगाव यांच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा कलम ३, ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गोपनीय माहितीवरुन पोलीस अधीक्षक संजयकुमार बाविस्कर तथा अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा बुलडाणाचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे, सहायक पोलीस निरीक्षक विनायक कारेगावकर, पोलीस उपनिरीक्षक सैयद मोहसीन, दिनकर गोरे, बबन रायपुरे, पोहेकॉ ठाकूर, सैयद हारुण, अताउल्ला खान, अविनाश जाधव, गजानन आहेर, विलास साखरे, रामेश्‍वर मुंढे, दीपक पवार, महिला पो.कॉ. सरिता वाकोडे या पथकाने ३१ मार्चला रात्री १0.३0 वाजता सदर दुकानावर धाड टाकली व दुकानच्या शटरला असलेले कुलूप तोडून १ एप्रिलच्या सकाळी ३ वाजेपर्यंत कारवाई केली. यावेळी ४0 बॅरल रॉकेल, दोन कॅन, दोन पांढर्‍या कॅन, चाळी, अर्धा एच.पी. इलेक्ट्रिक मोटार, असा एकूण १ लाख ६१ हजार २३0 रुपयांचा माल जप्त केला. यावेळी नायब तहसीलदार सोले यांची उपस्थिती होती. जळगाव जामोद ते नांदुरा रोडवरील गोरक्षण वाडी भागातील स्वस्त धान्य दुकानात व आजूबाजूचे दुकानात निळ्या रंगाचे रॉकेल काळ बाजारात विक्रीकरिता साठवून ठेवल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरुन ही कारवाई करण्यात आली.