शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

World Sparow Day : गुरुजींच्या अंगणात चिऊताईची शाळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 12:01 IST

World Sparow Day चिमणीला  कृत्रिम परंतु पर्यावरणपूरक घरटे  खामगाव येथील कलाध्यापक संजय गुरव यांनी मिळवून दिले आहे.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: हल्लीच्या काळात मानवीवस्तीचे रूपांतर काँक्रीटच्या जंगलात झाले आहे. त्यामुळे मानवीवस्तीत आढळणारी घर चिमणी (हाऊस स्पॅरो) किंवा लाकडी चिमणी दिसेनाशी झाली आहे. काँक्रीटच्या जंगलात इवलाशा जीवला घरटे करणे कठीण झाले असतानाच,  चिमणीला  कृत्रिम परंतु पर्यावरणपूरक घरटे  खामगाव येथील कलाध्यापक संजय गुरव यांनी मिळवून दिले आहे. त्यामुळे गुरूजींच्या अंगणात चिऊताईची शाळा भरल्याचे नेहमीच दृष्टीस पडते. चिमणीच घर होत शेणाच...येगं-येगं चिऊताई घरट्यात...चिऊताई- चिऊताई दार उघड,चिऊ ये-दाना खा,पाणी पी आणि भूरर्र ऊडून जा अश्या अनेक कविता व गाण्यांचा वर्षाव आमच्या कानांवर पडून,पडून आम्ही लहानाचे मोठे झालो आणि आता म्हातारे होणार. आमच्या बालपणी कवितेच्या ओळीतून भूरर्र उडून गेलेली चिऊताई आता दूरदूर पर्यंत दृष्टीस पडत नाही. पूर्वी अंगणात,खिडकीतून,छपरा खालीच नव्हेतर घरात दिसणारी चिमणी तिचा अधिवास नष्ट झाल्याने शहरापासून लांब निघून गेली आताच्या घडीला काहीशा प्रमाणात शहरा बाहेरच्या भागात किंवा ग्रामीण भागात थोड्या प्रमाणात दिसून येते. बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, चंद्रपुर, यवतमाळ, वाशिम, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, मुंबई, नासिक, धुळे, जळगांव (खा), मध्यप्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, आंध्रप्रदेश अशा महाराष्ट्रातील जिल्ह्यातच नव्हेतर  विविध राज्यात सुध्दा सरांचा उपक्रम पोहोचला आहे. त्याकरिता त्यांना महाराष्ट्र शासनाचा "सृष्टी मित्र" पुरस्कार २०१५ साली प्राप्त झाला आहे. सन २००७पासून दरवर्षी किमान दोन ते तीन हजार घरटे वितरित करण्यात येत असून त्याकरिता नातेवाईक, मित्र, शेजारी, विद्यार्थी,पालक, सहकारी शिक्षक, सामाजिक संस्था, पत्रकार बंधू यांचे खुप मोठं योगदान आहे. प्रत्येकाने आपल्या अंगणात चिमणी करीता किमान एक घरटे लावा त्यांचे दाना पाण्याची व्यवस्था करून चिमणी व इतरही आपल्या अंगणात येणा-या पक्षांचे संवर्धन करा असा संदेश आपल्या जनजागृतीतून तथा उपक्रमाचे माध्यमातून कलाध्यापक संजय गुरव नेहमीच देत असतात.२० मार्च जागतिक चिमणी दिवस म्हणून सगळी कडे साजरा केला जातो परंतू कलाध्यापक संजय गुरव यांचा प्रत्येक दिवस हा चिमणी दिवसच असतो म्हणूनच त्यांचे अंगणात व परिसरात कायमच चिऊताई व त्यांचे थवे बघावयास मिळतत.त्यानी तयार केलेल्या व लावलेल्या घरट्याचा चिमण्या सहज स्विकार करतात व त्या प्रत्येक घरट्यात चिमण्या आपल्या पिल्लांना भरवतांनाचे अनेक दाखले संजय गुरव त्याचे कडील छायाचित्र व चलचित्राचे माध्यमातून देतात तसेच त्यांचे कडे गेल्यास प्रत्यक्ष हे सारे अनुभवायला मिळते.अनेक शिक्षक त्यांचा हा उपक्रम आपल्या घरी व शाळा तथा महाविद्यालयात राबवत आहेत. आपणही या उपक्रमात सामिल व्हावे सामिल झाले पाहिजे हीच अपेक्षा. आपल्या घरी अडगळीत टाकून दिलेली खर्डे, खोकी, लाकडी फड्या यापासून पर्यावरणपूरक घरटी तयार करून लावल्यास चिमण्या त्यांचा नक्कीच स्विकार करतात.

 चिमण्यांना मिळवून दिला हक्कांचा अधिवास! चिमणी पक्षी आपली घरटी वळचणीला,सांधी, सापटी, फटीत, मातीच्या भिंतीतील छिद्र, खाच फोटोफ्रेमच्या मागची बाजू, आळोसा अश्या ठिकाणी बनवत असे. संजय गुरव यांनी ‘चिमणी वाचवा’या उपक्रमाचे माध्यमातून संपूर्ण परिसरात चिमण्याना त्यांना पूर्वी सारखाच अधिवास मिळवून दिला व ज्यामुळे त्यांच्या घराच्या परिसरात सगळीकडे चिमण्यांचे थवे मोठ्या प्रमाणावर दृष्टीस पडतात. जणूकाही गुरुजींच्या अंगणात चिवूताईची शाळाच भरली आहे. बाराही महीने सदैव चिमण्यांच्या सोबतच इतरही पक्षांच्या दाना पाण्याची व्यवस्था करून जवळपास त्यांचे अंगणात शभरावर चिमणी घरटे लावली आहेत.

 अशी केली घरट्यांची निर्मिती! तननाशक फवारणी मुळे चिमणी व इतर पक्षांना घरट्यात पिल्लांकरीता गादी(कुशन बाऊल )करण्यासाठी लागणारे मऊ गवत साहित्य शोधूनही मिळत नाही व पयार्याने त्या प्लास्टिकच्या मऊ पिशवीचे तुकडे ,प्लास्टीकची दोरे वापरतात जी त्याचे पिल्लांना घातक ठरतात. म्हणून कलाध्यापक संजय गुरव यांनी आपल्या अंगणात सुतळी,चिंध्या तसेच पॅकिंग करीता वापरले जाणारे तांदूळाचे (तणस)गवत पोकळ स्वरूपात वळचणीला बांधून ठेवतात व ह्या चिंध्या, गवत, सुतळी, दोरे यांचा उपयोग चिमण्या आपल्या घरकुल निर्मिती करीता मोठ्या आनंदाने करतात.

टॅग्स :khamgaonखामगाव