शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

World Blood Donor Day :  कोरोना काळात दहा हजार जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 11:43 IST

World Blood Donor Day: कोरोना संसर्गाच्या काळात बुलडाणा जिल्ह्यात जवळपास दहा हजार नागरिकांनी रक्तदान केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोना संसर्गाच्या काळात बुलडाणा जिल्ह्यात जवळपास दहा हजार नागरिकांनी रक्तदान केले आहे. १४ जूनच्या रक्तदाता दिनानिमित्ताने माहिती घेतली असता ही बाब समोर आली. गेल्या वर्षभरात शासकीय रक्तपेढ्यांद्वारे जवळपास १४० रक्तदान शिबीरेही झाली. जिल्ह्यात बुलडाणा, खामगाव आणि शेगाव येथे शासकीय रक्तपेढी असून खामगाव, आणि बुलडाणा येथे तीन खासगी रक्तपेढ्या आहेत. या सर्व रक्तपेढ्यांची जवळपास एक हजारपेक्षा अधिक रक्तपिशव्या साठवण्याची क्षमता आहे. २०२१ मधील साडेपाच महिन्यात शासकीय रक्तपेढीद्वारे आतापर्यंत १८०० रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले आहे. थोडक्यात १८०० जणांनी रक्तदान केले आहे तर आतापर्यंत २५ रक्तदान शिबीरेही घेण्यात आली असल्याची माहिती रक्तपेढीतील वैज्ञानिक अधिकारी संजय सपकाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

आपत्कालीन स्थितीसाठी साठवण केंद्रआपत्कालीन परिस्थितीत जिल्ह्यात वेळेत रक्त रुग्णालयापर्यंत पोहोचविण्यासाठी मलकापूर, चिखली, मेहकर, देऊळगाव मही आणि सि. राजा येथे रक्तसाठवण केंद्र उभारण्यात आले आहे. येथून अल्पावधीत जिल्ह्यात त्वरित रक्त पोहोचविता येते, असे रक्तपेढीतील वैज्ञानिक अधिकारी संजय सपकाळ यांनी स्पष्ट केले.

आज रक्तदान शिबीररक्तदाता दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीमध्येही एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून रक्तदात्यांनी येथे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सकांसह रक्तसंक्रमण अधिकारी यांनी केले आहे.

टॅग्स :World Blood Donor Dayजागतिक रक्तदाता दिवसbuldhanaबुलडाणा