मासरूळ गावात सर्वच देवतांची मंदिरे आहेत़ श्री चक्रधर स्वामी यांची दोन मंदिरे असून इथे महाराष्ट्रासह इतर राज्यांतून भाविक येतात़ श्री चक्रधर स्वामी मासरूळ गावामध्ये एक मास स्थानबद्ध होते़ त्यामुळे या गावाची आगळीवेगळी ओळख निर्माण झाली आहे़ गावातून ऋषीपंचमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे पायी दिंडीचे आयोजन असते़ या दिंडीचे प्रमुख कालिदास नाना देशमुख हे असून त्यांनी श्री गजानन महाराज मंदिर उभारण्याची संकल्पना २०१९ मध्ये पायी दिंडीमध्ये जात असताना मांडली हाेती़ अंकुश बबनराव देशमुख यांनी गजानन महाराज मंदिरासाठी दीड गुंठा जमीन दान दिली़ तसेच इतर ग्रामस्थांनीही देणगी दिल्यानंतर मंदिराच्या कामास सुरुवात करण्यात आली़ सध्या मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आले आहे़
संत गजानन महाराज मंदिराचे काम अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:38 IST