शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

घरकुलांचे काम रखडणार

By admin | Updated: June 20, 2015 02:56 IST

कंत्राटी कामगारांची सेवा संपुष्टात.

बुलडाणा : रमाई घरकुल योजनेतील कंत्राटी अभियंत्यांची सेवा ३0 जूनपर्यंत संपुष्टात येत आहे. हे कंत्राटी अभियंते कामावरून कमी झाल्यास घरकुल योजनेला खीळ बसणार असून, जिल्ह्यातील सहा हजार घरकुलांची कामे ठप्प होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दारिद्रय़रेषेखालील मागसवर्गीय घटकातील गोरगरीब नागरिकांना हक्काचं घरकुल मिळावं म्हणून शासनाने रमाई घरकुल ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. बुलडाणा जिल्ह्यात या योजनेमधून २0१४ अखेर १0 हजार ८४३ घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. त्यापैकी ३ हजार ९७0 घरकुलांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले, तर एप्रिल २0१५ अखेर जिल्ह्यात १५ हजार २0२ घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. त्यापैकी ७ हजार ६६७ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. सध्या ६ हजार ६२१ घरकुलाची कामे प्रगतिपथावर आहेत. ही घरकुले तांत्रिकदृष्ट्या पूर्ण करून घेण्यासाठी जिल्ह्यात कंत्राटी अभियंत्यांची नियुक्ती केली होती; मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने राज्यातील सर्व कंत्राटी अभियंत्यांची सेवा खंडित केली आहे. त्यामुळे सहा हजार घरकुलांचे बांधकाम रखडणार असल्याने गरीब कुटुंबांचे मालकीच्या घराचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे.