शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मनरेगाच्या माध्यमातून भरीव काम करावे- पुलकुंडवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 00:22 IST

यंत्रणेतील घटकांनी योजनेच्या अंमलबजावणीमध्ये गंभीरपणे काम करावे. या योजनेतून जलसंधारणाची कामे करता येतात. त्यामुळे मनरेगामधून विकासात्मक भरीव कामे करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.

ठळक मुद्देसक्षम मनरेगा कार्यशाळेचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना शासनाची अत्यंत महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून समाजातील शेवटचा घटक असलेल्या गरीब, आर्थिक दुर्बलांच्या आयुष्यात संपन्नता आणता येणे शक्य आहे. यंत्रणेतील घटकांनी योजनेच्या अंमलबजावणीमध्ये गंभीरपणे काम करावे. या योजनेतून जलसंधारणाची कामे करता येतात. त्यामुळे मनरेगामधून विकासात्मक भरीव कामे करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या सक्षम मनरेगा या कार्यशाळेचे आयोजन बुधवारला करण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटनीय कार्यक्रमात जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन, उपजिल्हाधिकारी (रोहयो) राजेंद्र देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय चोपडे, अमरावतीचे कार्यकारी अभियंता असलम खान, कृषी सहसंचालक कार्यालयाचे भौगोलिक माहिती प्रणाली सहायक किशोर चावंदे, नरेगा गटविकास अधिकारी चंदनसिंग राजपूत आदी उपस्थित होते. सक्षम मनुष्यबळाचा उपयोग करून ‘माथा ते पायथा’ जलसंधारण कामांचा अवलंब करण्याच्या सूचना करीत जिल्हाधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार  म्हणाले की, मनरेगामधून पाणी अडविता येण्याजोग्या ठिकाणांचा शोध घेऊन त्याठिकाणी जलसंधारणाची कामे घ्यावीत.  हवामान बदलाचे वारे वाहत आहेत. आपल्याला या बदलाची जाणीवसुद्धा होत आहे. अशा परिस्थितीत पावसाळा अनियमित स्वरूपाचा होत आहे. या परिणामांपासून समाजाचा बचाव करण्यासाठी जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य द्यावे लागणार आहे. मनरेगामधून ही कामे करता येणार आहेत. याप्रसंगी दीप प्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन यांनीसुद्धा मार्गदर्शन केले. प्रशिक्षण कार्यशाळेला उपस्थित तज्ज्ञ व्यक्तींनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी रोहयो  देशमुख यांनी केले. कार्यशाळेला तहसीलदार, रोहयो विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.