अंगणवाडी सेविकांना दिलेल्या ॲप्स मध्ये अनेक त्रुटी आहेत. डिलीट पर्याय नसणे, वर्गवारी आणि लाभार्थी घटनांना बदलणे, दैनंदिन करण्याचे काम आणि द्यावयाच्या कोणतेही मार्गदर्शन न येणे माहिती भरण्याची पद्धत अतिशय किचकट असणे असा त्रुटीमुळे कामात मदत होणे एवजी त्रास वाढला होता. या संदर्भात तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी २४ सप्टेंबरला कामबंद आंदोलन पुकारून एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना निवेदन दिले. अंगणवाडी संघटनेच्या तालुका सचिव लक्ष्मीबाई खरात, सुनीता काळे, शीला गिते, उषा साप्ते, मंदाताई डोईफोडे, शोभा जाधव, संगीता मोरे, सारिका काळे, सुनीता जायभाये, उषा मगर, मंगल मुंडे, संगीता दहातोंडे, संगीता गवई, गोदावरी वाघ, रेणुका पोटे, स्वाती सोनवणे आदींसह तालुक्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस उपस्थित हाेते.
अंगणवाडी सेविकांचे काम आंदाेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:37 IST