शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदी करण्यासाठी सरसावल्या महिला

By admin | Updated: May 26, 2017 01:23 IST

चिखली : तालुक्यातील खैरव गावात विकल्या जाणाऱ्या अवैध दारूमुळे महिलांच्या अस्मितेला धोका पोहोचतोय. शिवाय गावातील अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : तालुक्यातील खैरव गावात विकल्या जाणाऱ्या अवैध दारूमुळे महिलांच्या अस्मितेला धोका पोहोचतोय. शिवाय गावातील अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत तर तरूणांसह कोवळ्या वयातील मुलेदेखील दारूच्या आहारी जात असल्याने येथील महिलांनी एकत्र येत गावातील अवैध दारूविक्रीला लगाम लावावा व संपूर्ण दारूबंदी करावी, अशी मागणी केली.तालुक्यातील खैरव येथे अवैध दारूविक्री होत असल्यामुळे काही महिलांचे पती व किशोरवयीन मुले व्यसनाधीन झाली आहेत. शिवाय दारू पिऊन महिलांना मारहाण करण्याच्या घटना तसेच कौटुंबिक अत्याचार वाढले असून, गावातील लग्नसमारंभ व इतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये भांडण-तंटे वाढले आहेत. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, गावातील दारूड्यांमुळे सार्वजनिक ठिकाणी महिलांची अस्मिता धोक्यात आली आहे. दारूविक्रेत्यांवर कोणाचाही वचक नसल्यामुळे राजरोसपणे दारू विकली जात असल्याचा आरोप महिलांनी केला आहे, तसेच गावातील शांतता व सुव्यवस्थेला धोका निर्माण झाला असल्याने गावातील अवैध दारू विक्री तातडीने बंद करण्यात यावी, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा सुमारे ५० महिलांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन चिखली पोलीस स्टेशनसह, राज्य उत्पादन शुल्क तसेच आमदार राहुल बोंद्रे यांनादेखील देण्यात आले आहे.