खामगाव : विषारी औषधाची शिशी उघडताना विष पोटात गेल्याने महिला अत्यवस्थ झाली. ही घटना निमगाव ता.नांदुरा येथे घडली. निमगाव येथील वैशाली गणेश गावंडे (वय २५) ही महिला शेतात फवारणीसाठी विषारी औषधाची बाटली फोडत असताना विषारी औषध पोटात गेल्याने अत्यवस्थ झाली. त्यामुळे सदर महिलेस येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. महिलेची प्रकृती स्थिर असून, पुढील उपचार सुरू आहेत.
विषबाधेमुळे महिला अत्यवस्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2017 04:47 IST