शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दागिन्यांची बॅग लंपास करणारी महिला गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:04 IST

चिखली: सतत वर्दळीचा व मुख्य बाजारपेठेचा रस्ता असलेल्या  येथील डीपी रोडस्थित कृष्ण ज्वेलर्स या सराफा दुकानातून  दागिन्यांनी भरलेली बॅग लंपास करणार्‍या महिलेला चिखली  पोलिसांनी २८ ऑक्टोबर रोजी बीड जिल्हय़ातील गेवराई येथून  अटक करून १ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळविला आहे.

ठळक मुद्देसराफा दुकानातून लंपास केली होती दागिन्यांनी भरलेली बॅग बॅग लंपास करणारी महिला चिखली पोलिसांच्या ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: सतत वर्दळीचा व मुख्य बाजारपेठेचा रस्ता असलेल्या  येथील डीपी रोडस्थित कृष्ण ज्वेलर्स या सराफा दुकानातून  दागिन्यांनी भरलेली बॅग लंपास करणार्‍या महिलेला चिखली  पोलिसांनी २८ ऑक्टोबर रोजी बीड जिल्हय़ातील गेवराई येथून  अटक करून १ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळविला आहे. या प्रकरणातील आणखी दोन महिला अरोपींचा शोध सुरू  आहे.स्थानिक डी.पी. रोडवर बसस्थानक परिसरात भगवान वाळेकर  यांचे o्रीकृष्ण ज्वेलर्स हे सोन्या-चांदीचे दुकान आहे. २३ ऑ क्टोबरच्या सकाळी १0 वाजता भगवान वाळेकर हे दुकानातील  कामात व्यस्त होते, तर मुलगा अजय वाळेकर दुकानाची  साफसफाई करत असताना त्यांनी काउंटरवर दागिन्यांच्या दोन  बॅगा ठेवल्या होत्या. त्यापैकी एकात सोन्याचे दागिने होते तर  एकात चांदीचे दागिने होते. दरम्यान, लाल रंगाची साडी नेसलेल्या  महिलेने दुकानात प्रवेश करून वाळेकर पिता-पुत्राची नजर  चुकवित चांदीच्या चेनपट्टी व इतर सुमारे २ लाख ४0 हजार रुपये   किमतीच्या ८ ते १0 किलो वजनाच्या चांदीच्या दागिन्यांची बॅग  लंपास केली होती. सदर महिलेची चोरी सीसी कॅमेर्‍यात कैद झाली होती. त्याआधारे  चिखली पोलिसांनी तपास चालविला होता. याअंतर्गत सदर सीसी  फुटेज सर्व पोलीस स्टेशनला पाठविण्यात आले होते. ३0 एप्रिल  २0१७ रोजी खामगाव शहरात याचप्रकारे मीरा विठ्ठल शिंदे व  रंजना राजेश क्षीरसागर या दोन महिलांनी चोरी केली होती. त्यांना  अटक करून त्यांच्या विरोधात गुन्हेदेखील दाखल होते; मात्र  सध्या त्या दोघींची जामिनावर सुटका झाली असल्याची माहिती  दिली, तर महिला पोलीस मार्गट यांनी सीसी फुटेजमधील  महिलांची ओळख पटविल्याने ठाणेदार महेंद्र देशमुख यांच्या नेतृ त्वात पोलीस उपनिरीक्षक सुधाकर गवारगुरू, पोहेकॉ तायडे,  पोकॉ सोनकांबळे, पोकॉ तांबेकर, मपोकॉ पवार यांनी गेवराई ये थून रंजना राजेश क्षीरसागर (वय २५ वष्रे) रा. संजय नगर  गेवराई हिला अटक केली आहे. दरम्यान, अटकेतील महिला  अरोपी रंजना क्षीरसागर हिला न्यायालयासमोर उभे केले असता  न्यायालयाने १ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कस्टडी ठोठावली आहे. या प्रकरणाती मुख्य आरोपी शकुनाबाई भुर्‍या शिंदे व अन्य एक  महिला फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान  या प्रकरणातील महिलांनी यापूर्वी कर्नाटकमध्येसुद्धा सराफा  दुकानातून अशाच प्रकारे बॅग चोरल्या असून, या महिला  टोळीद्वारे केलेल्या अशा गुन्हय़ांची अनेक प्रकरणे उघडकीस  येण्याची शक्यता आहे. पुढील तपास पोउपनि सुधाकर गवारगुरू,  पोकाँ उमेश शेगोकार करीत आहेत. 

टॅग्स :Crimeगुन्हा