शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

बाबांसारखे पोलीस, डॉक्टर होणार का; मुले म्हणतात नको रे बाबा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:35 IST

बुलडाणा : जिल्ह्यात गत काही महिन्यांपासून काेराेना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आराेग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे़ यासोबतच पोलीसदेखील ...

बुलडाणा : जिल्ह्यात गत काही महिन्यांपासून काेराेना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आराेग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे़ यासोबतच पोलीसदेखील दिवसरात्र एक करून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवत आहेत. यामुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष झाल्याने कुटुंबातील मुलांचा या क्षेत्राकडे पाहण्याच दृष्टिकोन काहीसा बदलला आहे़ याबाबतचे वास्तव जाणून घेण्यासार्ठ लोकमतने फ्रन्टलाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या योद्ध्यांच्या मुलांशी थेट संपर्क साधला असता त्यांनी आपल्य मनातील गुपित लोकमतकडे व्यक्त केले. अनेक मुलांनी आपल्या वडिलांबद्दल समाधान व्यक्त केले. मार्च महिन्यांपासून जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढतच आहे़ अनेक डाॅक्टरांना काेविड केअर सेंटरमध्ये सेवा द्यावी लागत आहे़ जीवाची पर्वा न करता हे कर्मचारी काेराेनाबराेबर लढत आहेत़ जबाबदारी वाढल्याने साहजिकच अनेक डाॅक्टर आणि पाेलीस आपल्या मुलांना फारसा वेळ देऊ शकत नाही़त त्यामुळे अनेक चिमुकल्यांना आपल्या वडिलांनी जाॅब साेडून घरीच आपल्याबराेबर खेळावे असे वाटते़ तसेच काहींनी माेठे झाल्यानंतर काेराेना असेल तर डाॅक्टर न........... हाेणार नसल्याचे............. सांगितले़ काही मुलांना आपल्या वडिलांच्या सेवाकार्याचा अभिमान असल्याने लाेकसेवाच करणार असल्याचे त्यांनी सांगितले़

काेट

लोकसेवा घडेल असेच काम करण्याची इच्छा आहे़ काम कुठेही करता येते़ परंतु वडील जे काम करतात यातून मिळणारे समाधान आणि आनंद वेगळा असताे़ त्यामुळे वडिलांसारखेच पाेलीस बनून लाेकसेवा करण्याची माझी इच्छा आहे़

ज्ञानदा साेमनाथ पवार, किनगाव राजा

सध्या नियमांची अंलबजावणी करताना पाेलिसांवर कामाचा ताण वाढला आहे़ त्यामुळे पाेलीस विभागापेक्षा डाॅक्टर हाेण्याला मी पसंती देईन. वडिलांच्या नाेकरीचा अभिमान आहे़ मात्र, कामाचा ताण पाहता पाेलीस हाेण्यासाठी माझी पसंती नाही़

वेदान्त शिवदत्त वारे, मेहकर

पाेलिसांना कधीच सुट्या नसतात़ कडक निर्बंध असताना इतर कर्मचारी सुटीवर आहेत़ मात्र, पाेलिसांना संचारबंदीतही काम करावे लागते़ त्यामुळे पाेलीस हाेण्याएवजी दुसऱ्या विभागात नाेकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे़

नैतिक दत्तात्रय पठारे, मेहकर

पाेलिसांवर ताण असला तरी त्यांच्या कामाचा अभिमान आहे़ काेराेना असाे किंवा दुसरी कुठलीही गाेष्ट असाे पाेलिस कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुढाकार घेतात़ त्यामुळे पाेलीसच व्हायचे आहे़

राज गणेश लाेंढे, मेहकर

माझे वडील पोलीस असून मला त्यांचा अभिमान आहे. ते आपले कर्तव्य कोणत्याही परिस्थितीत झोकून देऊन करतात त्यामुळे मी पोलीस अधिकारीच हाेईन.

अर्णव नितीन खराडे, डोणगाव

मी दररोज पोलीस कर्मचारी यांची समाजाप्रती सेवा पाहतो़ माझे वडीलही पोलीस असून त्यांचा मला अभिमान आहे़ कोरोना काळात पोलीस रस्त्यावर उभे राहून देशातील नागरिकांना कोरोनापासून वाचविण्यासाठी प्रयत्नशील आहे़ त्यामुळे पुढे मी भविष्यात पोलीस अधिकारी किंवा डॉक्टर होऊन समाजाची सेवा करेन.

सोहम विनोद इंगोले, डाेणगाव

काेराेना वाढल्यामुळे आई, वडील सहा महिन्यातून एकदा भेटतात़ त्यामुळे जाेपर्यंत काेराेना आहे ताेपर्यंत वैद्यकीय क्षेत्रात नाेकरी करायची नाही़ वैद्यकीय क्षेत्रात आईवडील काम करीत असल्याचा अभिमान आहे़ मात्र, त्यांनी नाेकरी साेडून आमच्याबराेबर रहावे असे वाटते़ मला आयपीएस व्हायचे आहे़

रुद्र किशाेरकुमार बिबे, बुलडाणा

काेराेना वाढल्यापासून वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर ताण वाढला आहे़ त्यामुळे काेराेना असेल तर मला डाॅक्टर व्हायचे नाही़ दुसऱ्या विभागात नाेकरी करायला मी प्राधान्य देईन. वडील डाॅक्टर असल्याचा मला अभिमान आहे़

भक्ती सुनील भराडे, मेहकर

काेराेना आला तेव्हापासून वडील जास्त वेळ देऊ शकत नाहीत. काेराेनाच्या संकटात ते लाेकांना वाचवण्यासाठी धडपड करीत असल्याचा अभिमान आहे़ मात्र आयएसएस, आयपीएस हाेण्याची माझी इच्छा आहे़

आराध्य मनीष धारतकर