शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खासगी बसेसवर कारवाईची मोहिम तीव्र करणार - जयश्री दुतोंडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 16:00 IST

- संदीप वानखडे  लोकमत न्यूज नेटवर्क गुजरात, मध्यप्रदेशातील खासगी बसेस बुलडाणा जिल्ह्यात धावत आहेत. परवानगी नसताना तसेच कुठलीही आरोग्य ...

- संदीप वानखडे लोकमत न्यूज नेटवर्कगुजरात, मध्यप्रदेशातील खासगी बसेस बुलडाणा जिल्ह्यात धावत आहेत. परवानगी नसताना तसेच कुठलीही आरोग्य तपासणी न करता प्रवाशांना बसमध्ये प्रवेश देण्यात येत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भिती व्यक्त होत आहे. या बसेसवर कारवाईविषयी बुलडाणा येथील सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांच्याशी साधलेला संवाद... 

 गुजरात, मध्यप्रदेशातील खासगी बसच्या माध्यमातून वाहतुक सुरु आहे, याविषयी आपली भूमीका काय आहे?परराज्यातून धावणाºया खासगी बसेसवर कारवाईची मोहिम सुरू केली आहे. ही मोहिम आणखी तीव्र करण्यात येणार आहे. या बसेसची कागदपत्रे, प्रवाशांचे इ-पास आणि फिजिकल डिस्टन्स आहे किंवा नाही या मुद्यांवर कारवाई करण्यात येत आहे. 

आतापर्यंत किती खासगी बसवर कारवाई करण्यात आली? आतापर्यंत जिल्ह्यात विनापरवानगी धावणाºया १४ खासगी बसेसवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये परराज्यासह इतर जिल्ह्यातील बसेसचा समावेश आहे. दोन खासगी बस मालकांवर दंडात्मक कारवई केली आहे. या बसेसवर कारवाईची मोहिम यापुढेही सुरूच राहणार आहे.    

या बसेसना आळा घालण्यासाठी काय उपाययोजना केली? खासगी बस जप्त करण्याची मोहिम सुरू करण्यात आली आहे. पुन्हा त्याच बस प्रवाशी वाहतुक करताना आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये दंड वाढविण्यात येईल. तसेच वेळ पडल्यास अशा बसेसचे परवाने निलंबीत करण्याची कारवाई करण्यात येईल. नियमांचे पालन न केल्यास खासगी बस मालकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. येत्या काही दिवसात ही मोहिम आणखी तीव्र करण्यात येईल. 

नंबर नसलेल्या वाहनांवर काय कारवाई होणार ?जिल्ह्यात अनेक वाहनावर नंबर टाकलेला नसतो. अशी वाहने रेतीची अवैध वाहतुक करण्यासाठी वापरण्यात येतात. या वाहनांवरही १ जुलैपासून कारवाई सुरू करण्यात आली आहे. तसेच रिफ्लेक्टर न लावलेल्या वाहन चालकांवरही दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. विना क्रमांक आणि रिफ्लेक्टर नसलेली वाहने आढळल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे. महसूल वाढविण्याच्या दृष्टीने कार्यालयात नियमांचे पालन करून कामकाज सुरू करण्यात आले आहे. 

विनापरवानगी धावणाºया १४ खासगी बसेसवर कारवाई करण्यात आली आहे. कारवाई करण्यात आलेली ही वाहने पुन्हा प्रवासी वाहतूक करताना आढळून आल्यास त्यांना केलेल्या दंडात अधिक वाढ करून कठोर कारवाई करण्याच्या दृष्टीने सतर्क आहोत. परराज्यातून येणाºया खासगी बसेसवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. या बस जप्त करण्याची मोहिम सुरू आहे - जयश्री दुतोंडे

टॅग्स :buldhanaबुलडाणाRto officeआरटीओ ऑफीसinterviewमुलाखत