शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवात डीजेचा आवाज होणार का म्युट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 13:56 IST

डीजेवर बंदी आणली असली तरी सर्वत्रच डीजेचा कर्णकर्कश आवाज ऐकायला मिळतो.

- योगेश फरपट लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : न्यायालयाने ध्वनी प्रदुषण रोखण्यासाठी डीजे व डॉल्बीवर बंदी घातली आहे.यामुळे गणेशोत्सवानिमित्त आयोजित शांतता समितीच्या सभेत पोलिस प्रशासनाच्या वतीने डीजे व डॉल्बी न वाजविण्याचे आवाहन केले जात आहे. यामुळे गणेशभक्तांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.गणेशोत्सव व नवरात्रोत्सवादरम्यान काढल्या जाणाऱ्या मिरवणूकीत डीजे व डॉल्बीच्या तालावर युवक धमाल करतात. मात्र २०१७ पासून सर्वोच्च न्यायालयाने बंदी आणल्या नंतर अनेक ठिकाणी डीजेचा आवाज ‘म्युट’ करण्यात पोलिस प्रशासनाला यश आले. मात्र डीजेवर बंदी आणली असली तरी सर्वत्रच डीजेचा कर्णकर्कश आवाज ऐकायला मिळतो. यावर्षी पोलिस अधिक्षकांनी पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे यावेळेस डीजे चा आवाज म्युट होणार काय ? याकडे लक्ष लागले आहे. खºयाअर्थाने पोलिस प्रशासनासमोर डिजे आवाज म्युट करणे मोठे आव्हान आहे. बाप्पाच्या विर्सजनाच्या मिरवणुकीत खरी धमाल निर्माण होते ती डीजेमुळेच. मात्र यंदा डीजेवरील बंदीमुळे गणेश स्थापनेपूर्वीच गणेशभक्तांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

लेझीमसह ढोलचा वापर करापोलिस अधिक्षकांसह उपविभागीय पोलिस अधिकारी तालुक्याच्या ठिकाणासह संवेदनशिल गावामध्ये शांतता समितीच्या बैठका घेत आहेत. या बैठकीमध्ये पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करीत आहेत. डीजे ऐवजी लेझीमसह ढोलचा वापर करण्याचा सल्लाही देत आहेत.

तर पोलिस करणार कारवाईमिरवणूकीदरम्यान कोणत्याही सार्वजनिक मंडळाने डीजेचा वापर केला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पथके कार्यान्वीत केली आहेत.

गणेश विसर्जन मिरवणूकीत ध्वनी प्रदुषणाला स्थान नाही. डीजे किंवा डॉल्बीसारखे वाद्य वाजवून कुणीही न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करू नये. असा प्रकार निदर्शनास आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.- प्रदीप पाटील,उपविभागीय पोलिस अधिकारी, खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावGanesh Mahotsavगणेश महोत्सव