शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कौटुंबिक कारणावरून पत्नीची गळा आवळून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 16:09 IST

महिलेचे लक्ष्मी विकास घायाळ असे नाव आहे, तर विकास शेषराव घायाळ असे आरोपीचे नाव आहे.

लोणार : कौटुंबिक कारणावरून पत्नीचा शेतशिवारात गळा आवळून खून केल्याची घटना लोणार तालुक्यातील हिरडव परिसरात ३ सप्टेंबर रोजी घडली. दरम्यान, या घटनेनंतर आरोपी फरार झाला असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली.या घटनेत मृत झालेल्या महिलेचे लक्ष्मी विकास घायाळ असे नाव आहे तर विकास शेषराव घायाळ असे आरोपीचे नाव आहे. तीन सप्टेंबर रोजी विकास घायाळ (रा. हिरडव) हा पत्नी लक्ष्मी व दोन मुलांसह दुचाकीवर बोरखेडी येथे सासुरवाडीत गेला होता. तेथून परतल्यानंतर त्याने हिरडव येथे घरी सात वर्षाची मुलगी व तीन वर्षाच्या मुलाला ठेवून पत्नीसह हिरडव परिसरातील शेत गाठले. तेथे पत्नी लक्ष्मीचा साडीच्या पदराने गळा आवळून खून करीत पलायन केले, अशी तक्रार मेव्हणे संतोष भास्कर शहाणे यांनी लोणार पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपी विकास शेषराव घायाळ याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.  दोन दिवसात लोणार तालुक्यात दोन खुनाच्या घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.दरम्यान, विकास घायाळ यास मद्याचे व्यसन होते. त्यातून त्याचा वाद होत होता. परिणामी त्याच्या कुटुंबियांनीही गेल्या वर्षी पाच एकर शेती विकासच्या नावे करून दिली होती. त्यामुळे तो वेगळा राहत होता. दरम्यान, मद्याचे व्यसन त्यास असल्याने त्याचे मेव्हणे संतोष भास्कर शहाणे यांनी गावात नातेवाईकांना तीन सप्टेंबर रोजी फोन करून लक्ष्मी आणि विकास घायाळ पोहोचले का? याची विचारपूस केली होती. त्यावेळी मुले घरी खेळत असल्याचे नातेवाईकांनी त्यांना सांगितले होते. मात्र पती-पत्नी शेतात गेले असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र संतोष शहाणे यांना संशय आल्यामुळे त्यांनी नातेवाईकांना शेत शिवारात पाहण्यासाठी पाठवले असता साडीच्या सहाय्याने लक्ष्मीचा गळा आवळून खून केल्याचे निदर्शनास आल्याने हा प्रकार उघडकीस आल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले. सध्या आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे.प्रकरणी संतोष भास्कर शहाणे (३२, रा. बोरखेडी, ता. लोणार) यांच्या तक्रारीवरून लोणार पोलिसांनी विकास घायाळ विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार रविंद्र देशमुख हे करीत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी