शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

हिवरा आश्रम येथे गव्हाचा ट्रक पकडला

By admin | Updated: December 10, 2014 00:47 IST

मेहकर येथे पुरवठा विभागाची कारवाई.

मेहकर(बुलडाणा) : तालुक्यातील हिवरा आश्रम येथे पोलिसांनी गव्हाने भरलेला ट्रक ७ डिसेंबर रोजी पकडला होता. दरम्यान, सदर ट्रकमधील गव्हाची अन्न पुरवठा अधिकार्‍यांनी चौकशी केली आहे; मात्र या संदर्भात उलट-सुलट चर्चा सुरू आहे. एस. खादर बादशहा रा. ताडपत्री अनंतपूरम आंध्रप्रदेश हे ए.पी. 0२ टी.बी. ७४४४ क्रमांकाच्या ट्रकमध्ये गहू घेऊन जात होते. दरम्यान, पोलिस कर्मचारी मनोज खुंटे व डोईफोडे यांनी ट्रक चौकशीसाठी थांबविला. याची माहिती ठाणेदार मधुकर शिंदे यांना मिळाल्यावरून ते स्वत: घटनास्थळी गेले व ट्रक पोलिस स्टेशनला घेण्याचे सांगितले. सदर धान्याचा ट्रक पकडलेल्या घटनेची माहिती मेहकर तहसीलदार निर्भय जैन यांना देण्यात आली. दरम्यान, अन्न पुरवठा अधिकारी मानकर यांनी सदर गव्हाचा पंचनामा करून चौकशी केली असता या चौकशी पकडण्यात आलेला सदर गहू हा स्वस्त धान्य दुकानाचा नसून, विवेकानंद आश्रमाचा असल्याचे निष्पन्न झाले. विवेकानंद आश्रमाने अन्न पुरवठा कार्यालय मेहकर यांना दिलेल्या पत्रात सदर गहू हा संस्थानचा असून, दत्तात्रय सोळंकी रा. चिखली यांच्या माध्यमातून राजू अग्रवाल अडते रा. चिखली यांना अधिकृतपणे विक्री केल्याचे नमूद केले आहे. तर अन्न पुरवठा कार्यालय मेहकर यांनी पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, गव्हाच्या पोत्यावर शासकीय वितरण व्यवस्थेचा कोणताच ठप्पा नाही. तसेच धान्य तपासण्याची यंत्र सामग्री उपलब्ध नसल्याने हा गहू कंट्रोलचा असल्याचे निश्‍चित सांगता येत नाही; मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई न करता गव्हाचा ट्रक सोडून दिला.