शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

गव्हाच्या उत्पादनात होणार २५ टक्क्याने घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 13:43 IST

गहू पेरणी १५ नोव्हेंबरनंतर म्हणजे उशीराने केली गेल्याने यंदा गव्हाच्या उत्पादनात २५ टक्के घट येण्याची साधार भिती व्यक्त होत आहे.

- ब्रम्हानंद जाधव बुलडाणा: जिल्ह्यात रब्बी पेरणी ८३ टक्क्यापर्यंत पोहचली आहे. त्यामध्ये गहू पेरा नियोजित क्षेत्रापेक्षा निम्म्यावरच आहे. त्यातही गहू पेरणी १५ नोव्हेंबरनंतर म्हणजे उशीराने केली गेल्याने यंदा गव्हाच्या उत्पादनात २५ टक्के घट येण्याची साधार भिती व्यक्त होत आहे. अतीवृष्टीने रब्बी हंगामाच्या पेरणीस विलंब लागल्याचा फटका बऱ्याच पिकांना बसत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.रब्बी हंगामामध्ये गहू पीक हे अत्यंत महत्त्वाचे समजल्या जाते. इतर उत्पादनाच्या तुलनेत गव्हाची मागणीही सर्वाधिक असते. त्यामुळे बागायतदारांपाठोपाठ कोरडवाहू शेतकरीही गव्हाची पेरणी करतात. परंतू यंदाच्या रब्बी हंगामातील गहू पिकाचे नियोजनच कोलमडले. खरीप हंगाम अंतीम टप्प्यात असताना अतिवृष्टीचा जोर वाढला. त्यामुळे खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले. अतिपावसाने रब्बी हंगामावर संकट आले. रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी बहुतांश शेतामध्ये शेती मशागतही होऊ शकली नाही. परिणामी रब्बी हंगाम लांबला. जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सरासरी क्षेत्र १ लाख ५७ हजार ७६० हेक्टर आहे. त्यापैकी ८३ टक्के म्हणजे १ लाख ३० हजार ९४२ हेक्टर पेरणी करण्यात आली आहे. बागायती शेतीमध्ये गव्हाची पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात होणे चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाची असते.उशिरा पेरणी १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरपर्यंत करू शकतात. बागायती गव्हाची पेरणी १५ नोव्हेंबरनंतर उशिराने केल्यास प्रत्येक पंधरवड्यात गव्हाचे उत्पादन हेक्टरी २.५ क्विंटल एवढे घटते.तर जिरायत गव्हाची पेरणी आॅक्टोबरच्या दुसºया पंधरावड्यातच करावी लागते; परंतू यंदा गव्हाची पेरणी विलंबाने झाल्यामुळे हेक्टरी २.५ क्विंटलची घट शेतकºयांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.सरासरीपेक्षा निम्म्यावर पेराजिल्ह्यात गहू पिकाचे सरासरी क्षेत्र ६६ हजार ५०३ हेक्टर आहे. परंतू आतापर्यंत २८ हजार ६१४ हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात गहू पिकाचा पेरा सरासरीपेक्षा ४३ टक्के म्हणजे निम्म्यावर आला आहे.

मुळकुजव्या रोगामुळे हानीगहू पिकास थंड व कोरडे हवामान चांगले मानवते. मात्र सध्या हवामानात वेळोवेळी होणाºया बदलाचा फटका गहू पिकाला बसत आहे. धुक्यामुळे गहू पिकांना फुटवे कमी येत आहेत. त्यात आता ढगाळ वातावरणाने रोपांची मुळकुजव्या रोगामुळे हानी होत आहे.

 

 

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी