शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल बिघडला म्हणून काय झाले, आरोग्य बिघडायला नको!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 11:52 IST

Buldhana News : जवळपास दीड महिना दुकाने बंद असल्यामुळे मोबाईलच्या दुकानांवरही नागरिक गर्दी करत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोनाचे संक्रमण काही प्रमाणात कमी झाल्यानंतर कठोर निर्बंधांमध्ये प्रशासनाने थोड्याप्रमाणात शिथिलता दिली आहे. त्यामुळे छोट्या-मोठ्या कामांसाठी नागरिक घराबाहेर पडत आहेत. यात मोबाईल दुरुस्तीच्या कामांचाही समावेश आहे. जवळपास दीड महिना दुकाने बंद असल्यामुळे मोबाईलच्या दुकानांवरही नागरिक गर्दी करत आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाचीही आता नागरिकांना भीती राहली नसल्याचे चित्र आहे. परंतु मोबाईल बिघडला म्हणून काय झाले, आरोग्य बिघडायला नको, याची जाणीव ठेवून संक्रमण टाळण्याचे प्रयत्न होण्याची गरज आहे. मोबाईलचे वेड सध्या लहानांपासून मोठ्यांना आहे. मोबाईलमध्ये झालेली छोटी-मोठी खराबी, स्क्रीन गार्ड, बॅटरी बदलणे यासह नवीन मोबाईल घेण्यासाठी नागरिक, युवक वर्ग मोबाईलच्या दुकानात गर्दी करत आहे. त्यातून संक्रमण टाळण्यासाठी शारीरिक अंतर राखण्याकडे दुर्लक्ष होत आहे. प्रतिबंध हाच सुरक्षेचा प्रमुख उपाय आहे. मात्र त्यालाच बगल दिली जात असल्याचे एकंदरीत चित्र आहे. शेवटी मोबाईल बिघडला म्हणून काय झाले, आरोग्य बिघडायला नको, यासाठी काळजी घेण्याची गरज आहे.

५५ दिवसांपासून दुकाने बंदकोरोना प्रतिबंधासाठी लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळे जवळपास ५५ दिवस मोबाईलचीही दुकाने बंद होती. आता त्यात काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे मोबाईल दुरुस्ती, नवा मोबाईल घेण्यासाठी ग्राहक दुकानात येत आहेत. सुरक्षित अंतर राखण्यासोबतच नियमांचे पालन करण्याच्या सूचना आम्ही सातत्याने देत असतो. बऱ्याचदा ग्राहकांकडून त्याकडे दुर्लक्ष होते. कोरोनाचा फटका आमच्या व्यवसायालाही बसत आहे.- मयूर, मोबाईल व्यावसायिक

नव्यानेच नामांकित कंपनीत नोकरी लागली आहे. अद्याप कंपनीकडून लॅपटॉप मिळाला नाही. त्यामुळे मोबाईलवरूनच ऑनलाईन काम करत आहे. तो खराब झाल्यामुळे मोबाईल दुरुस्ती आवश्यक असल्याने मी आले आहे.- कल्याणी मुळे

माझ्या भाच्याचे १४ जूनपासून ऑनलाईन एज्युकेशन सुरू होत आहे. त्यासाठी मोबाईल आवश्यक आहे. तो हँग होत असल्याने दुरुस्तीसाठी दुकानात आलो होताे. सुरक्षेची काळजी आम्ही घेत आहोत.- संजय पानट

टॅग्स :buldhanaबुलडाणाMobileमोबाइल