शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

३१ हजार बांधकाम मजुरांना दीड हजार, नाेंदणी नसलेल्यांचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:34 IST

बुलडाणा : कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होऊ लागल्याने शासनाच्यावतीने काही कठोर निर्बंध घालण्यात आले आहेत. यातून बांधकाम व्यवसायाला काही ...

बुलडाणा : कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होऊ लागल्याने शासनाच्यावतीने काही कठोर निर्बंध घालण्यात आले आहेत. यातून बांधकाम व्यवसायाला काही नियम व अटी पाळून कामकाज सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असली तरीदेखील बांधकाम मजुरांना मदतीची अपेक्षा आहे. यासाठीच या लॉकडाऊनच्या काळात नोंदणी असलेल्या बांधकाम मजुरांना दीड हजार रुपये देण्याची घोषणा राज्य शासनाच्या वतीने करण्यात आली. जिल्ह्यातील नाेंदणी केलेल्या ३१ हजार ४५८ मजुरांना ही मदत मिळणार आहे़ मात्र, नाेंदणी न केलेल्या मजुरांची संख्या अधिक असून त्यांना लाभापासून वंचित रहावे लागणार आहे़

मग नोंदणी नसलेल्या बांधकाम मजुरांचे काय, असा सवाल मजुरांकडून उपस्थित होत आहे. राज्यात सुमारे बारा लाख बांधकाम मजूर आहेत. त्यातील दहा टक्के मजुरांची नोंदणी नसल्याने ते मदतीपासून वंचित राहतील. त्यामुळे नोंदणी नसलेल्या कामगारांवर अन्याय का, असा सवाल कामगार उपस्थित करत आहेत. नोंदणीचे दरवर्षी नूतनीकरण करावे लागते. मात्र, अनेकदा काहीजण दरवर्षी नोंदणी करत नाहीत, अनेकांना या नोंदणीबद्दल काही माहिती नसते त्यामुळे ते सरकारी मदतीपासून वंचित राहतात. सरकारने सरसकट सर्व मजुरांना मदत करायला हवी, अशी सर्व बांधकाम मजुरांची मागणी आहे. विशेषता ग्रामीण भागातील मजुरांनी नाेंदणीच केली नसल्याचे चित्र आहे़

आमच्या पोटापाण्याचे काय?

मी आणि माझा भाऊ बांधकामाच्या ठिकाणी काम करतो. सुरुवातीच्या काळात आम्ही दोघांनीही नोंदणी केली होती. मात्र, त्यानंतर परत नवीन नोंदणी केली नाही. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात सरकारकडून मिळणाऱ्या मदतीला आम्ही मुकलो.

- इस्माईल चौधरी, मजूर

अद्यापही बांधकाम मजूर म्हणून नोंद केली नाही. त्यामुळे मागील लॉकडाऊनमध्ये मिळणारी दोन हजार रुपयांची मदत मला मिळाली नाही. यंदा जाहीर केलेली दीड हजारांची मदतदेखील मला मिळणार नाही. सरकारने सरसकट सर्व मजुरांना मदत देणे गरजेचे आहे.

- शेख युनूस, मजूर

सरकारकडून मिळणारी मदत ही फार मोठी नाही. परंतु, ते पैसे कामगारांच्या हक्काचे आहेत. हातावर पोट असल्याने आधीच उदरनिर्वाहाचा प्रश्न समोर आहे. सरकारी मदत मिळाल्यास काही प्रमाणात धीर मिळतो. मात्र, नोंदणी नसल्यामुळे कामगार या मदतीपासून वंचित राहतो.

- जावेदखान साहेबखान, मजूर

नाेंदणी केलेले मजूर

३१४५८

नाेंदणी न केलेले मजूर

१५०००