शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम बंगालमधील तरुणीची चंदनपुरात हत्या

By संदीप वानखेडे | Updated: October 14, 2023 17:01 IST

दाेन संशयित युवक फरार, साेयाबीन साेंगणीसाठी पुण्यातून आले हाेते गावात

अंढेरा (बुलढाणा) : साेयाबीन साेंगणीसाठी आलेल्या मजूर युवतीची चिखली तालुक्यातील चंदनपूर येथे हत्या झाल्याची घटना १३ ऑक्टाेबर राेजी रात्री घडली. या युवतीबराेबर आलेले दाेन युवक पसार झाले आहेत. याप्रकरणी १४ ऑक्टाेबर राेजी अंढेरा पाेलिसांत तक्रार देण्यात आली आहे. आराेपींच्या शाेधासाठी अंढेरा पाेलिस व एलसीबीचे एक पथक रवाना झाले आहे.चिखली तालुक्यातील चंदनपूरमध्ये एक युवती व दोन युवक कामानिमित्त १३ ऑक्टोबर रोजी गावात आले होते. त्यांची राहण्याची सोय एका घरामध्ये केली होती. रात्रीच्या वेळेस त्या ठिकाणीच ते तिघे जण त्या घरामध्ये झोपले होते. शेती पंपाची मोटर चालू करण्यासाठी शेतात जाण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्याला त्या घराचा दरवाजा ११ ते १२ वाजेच्या सुमारास उघडा असल्याचे आढळला.

घरामध्ये जाऊन बघितले असता त्या ठिकाणी फक्त ती युवतीच जमिनीवर झोपलेल्या अवस्थेत आढळली. त्यांनी ही बाब सरपंच व गावातील इतर व्यक्तींना सांगितल्याने त्यांनी या घटनेची माहिती अंढेरा पोलिस स्टेशनला दिली. घटनेचे गांभीर्य पाहता अंढेरा पोलिस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील व पोलिस कर्मचारी यांनी तत्काळ घटनेच्या ठिकाणी धाव घेतली. घटनेच्या ठिकाणी १६ वर्षीय युवतीचा मृतदेह आढळून आला व त्या युवती सोबत असलेले दोन तरुण रात्रीच फरार झाल्याचे समोर आले. ठाणेदार विकास पाटील यांनी सूत्रे हाती घेऊन रात्रीच त्या दोन फरार युवकांचा शोध घेतला असता ते युवक कुठेच आढळून आले नाही.