शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
5
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
6
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
7
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
8
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
9
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
11
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
12
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
13
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
14
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
15
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
16
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
17
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
18
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
19
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
20
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत

‘श्रीं’चे श्रद्धापूर्वक स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 01:10 IST

शेगाव: श्री संत गजानन महाराज संस्थानच्यावतीने आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे काढण्यात आलेली पायदळ वारी पालखीसह रविवारी शेगावात परतली.

ठळक मुद्देभाविकांची अलोट गर्दी शेगावात संत गजाननाचा जयघोष

गजानन कलोरे।लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव: श्री संत गजानन महाराज संस्थानच्यावतीने आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे काढण्यात आलेली पायदळ वारी पालखीसह रविवारी शेगावात परतली. दोन महिन्यांच्या अथक प्रवासानंतर परतलेल्या वारकºयांचे भव्य स्वागत संस्थानसह शेगावकरांकडून करण्यात आले. यावेळी गजाननाच्या जयघोषाने संतनगरी दुमदुमली होती.दरवर्षीप्रमाणे पंढरपूर येथील आषाढी एकादशी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराजांची पालखी शेगाव येथून ३१ मे २०१७ रोजी निघाली होती. ५०० वारकºयांसह निघालेल्या या पालखी सोहळ्याचे परतीच्या प्रवासादरम्यान ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत झाले. शनिवारी खामगावात दाखल झाल्यानंतर वारकºयांचे स्वागत व मुक्काम झाला. त्यानंतर रविवारी पहाटे पालखी शेगावकडे मार्गस्थ झाली. या पालखीसमवेत खामगाव येथून हजारो भाविक पायदळ वारीत सहभागी झाले होते. त्यामुळे खामगाव ते शेगाव मार्गावरील वाहतूक दुपारपर्यंत बंद ठेवण्यात आली. सदर पालखी संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय येथे पोहचल्यानंतर संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांनी स्वागत केले. यावेळी श्रीकांतदादा पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य सोमाणी, नारायणदास पाटील, गोविंद कलोरे, पंकज शितुत, अशोक देशमुख, राजेंद्र शेगोकार, मधुकर घाटोळ आदींची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. रमेशचंद्र डांगरा यांच्या हस्ते रजत मुखवट्याचे पूजन व आरती करण्यात आली. तसेच गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय व श्री गजानन महाराज इंग्लिश स्कूलच्यावतीने वारकºयांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. यानंतर पालखी व सोबतच्या भाविक भक्तांसाठी श्री गजानन वाटिका येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी संस्थानचे विश्वस्त नीळकंठदादा पाटील यांनी पालखीचे स्वागत केले. यावेळी तहसीलदार गणेश पवार यांनीही दर्शन घेतले. दुपारी २ वाजता श्रींची पालखी नगरपरिक्रमेकरिता मुख्य मार्गाने मार्गस्थ झाली. यावेळी शहरवासीयांनी दर्शनाकरिता एकच गर्दी केली होती. टाळमृदंगाच्या गजरात गजाननाच्या जयघोषाने वातावरण भक्तिमय बनले होते. ठिकठिकाणी पालखीचे स्वागत करण्यात आले. पालखी मार्गावर व मंदिर परिसरात विविध आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. श्रींच्या पालखी सोहळ्यानिमित्त शेगावात लाखो भाविकांनी गर्दी केली होती. खामगाव परिसरच नव्हे तर बुलडाणा जिल्ह्यातील कानाकोपºयातून व अन्य जिल्ह्याातील भाविकांनीसुद्धा संतनगरीत हजेरी लावली. त्यामुळे पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.पालखीतील शिस्त ठरली आकर्षणसदर पालखी सोहळ्यातील वारकºयांची शिस्त आकर्षण ठरली. गण गण गणात बोते, राधेकृष्ण कृष्णराधे, नाम विठ्ठलाचे व गजाननाचे, माथी कुमकुम टिळा, मुखी हरिनाम कंठी तुळशी माळ, अशा जयघोषात खांद्यावर पताका घेतलेले शेकडो वारकरी शिस्तबद्ध पद्धतीने पावली करतानाचे दृश्य डोळ्यात साठवण्यासारखे होते.