शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

'धाडस' ग्रुप चे शारंगधर नगरीत स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:34 IST

मेहकर: शहरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदकडून तिथीनुसार शिवजयंती निमित्त नागपूर ते रायगड सायकलने प्रवास करणाऱ्या 'धाडस' ...

मेहकर: शहरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदकडून तिथीनुसार शिवजयंती निमित्त नागपूर ते रायगड सायकलने प्रवास करणाऱ्या 'धाडस' ग्रृपचे मंगळवारी स्वागत करण्यात आले.

नागपूर ते रायगड असा ६७३ कि.मी.चा विविध विषयात जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा अनोखा प्रवास सुरू आहे. 'धाडस' ग्रुप छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा घेऊन मार्गातील गावागावात महिला सशक्तीकरण, वृक्षारोपण, जलसंवर्धन, स्वच्छता, गड किल्ले संवर्धन अशा विविध विषयात जनजागृती करत आहे, अशी माहिती धाडस ग्रुपच्या प्रमुख वर्षा घाटोळे यांनी दिली. मंगळवारी सायंकाळी या टीमचे श्री. शारंगधर बालाजी मंदिरात आगमन झाले होते. यावेळी गुलाब पुष्प देऊन विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी टीमचे स्वागत केले. श्री.शारंगधर बालाजी संस्थांनचे अध्यक्ष दीपक पांडे यांच्या वतीने संस्थानतर्फे मॅनेजर हनुमंत देशमुख यांनी या टीमचे स्वागत केले. भाजपा महिला मोर्चा माजी जिल्हा अध्यक्ष अर्चना पांडे यांनी आपल्या घरी टीमचे व्यवस्थापन केले होते. श्री.बालाजी संस्थानचे पुजारी यांनी धाडस टीमला मंदिराविषयी माहिती सांगितली. यावेळी अभाविप महाराष्ट्र प्रदेश शोध कार्य सहसंयोजक अंबादास मेव्हणकर, सागर पांचाळ, अजय जौंजाळ, सुदर्शन जवंजाळ, विशाल शिंदे आदी विद्यार्थी उपस्थित होते. गावागावात टीमचे स्वागत करण्यात येत आहे. १२ सदस्यांची ही टीम १ एप्रिलला रायगडावर पोहचणार आहे.