शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
4
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
5
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
6
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
7
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
8
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
9
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
10
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
11
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
12
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
13
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
14
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
15
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
16
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
17
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
18
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
19
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
20
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!

घराला आग लागल्याने लग्नाचे कापड खाक

By admin | Updated: May 9, 2017 01:47 IST

डिग्रस येथील घटना; टेलरिंग व्यावसायिकाचे लाखो रुपयांचे नुकसान.

देऊळगाव मही : येथील घरच्या लग्न समारंभात व्यस्त असलेल्या छगन कान्हुजी वाळ यांच्या घराला आग लागून टेलरिंगच्या साहित्यासह लग्नाचे शिवण्यासाठी आलेले कापड खाक होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना ६ मे रोजी संध्याकाळी ७.३0 वाजता घडली.देऊळगाव राजा तालुक्यातील दिग्रस बु. येथील छगन कान्हुजी वाळ यांच्या भावाच्या मुलीचे लग्न असल्याने घरातील सर्व मंडळी लग्नसमारंभारात होते. लग्न समारंभानंतर रात्री ११ वाजता गावातील काही नागरिकांनी छगन कान्हुजी वाळ यांच्याकडे धाव घेत तुमच्या घराला आग लागल्याची माहिती दिली. यावेळी त्वरित छगन वाळ याचे दोन्ही मुलांनी घराकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत घरातील साहित्य खाक झाले होते. घरी गजानन छगन वाळ यांचा टेलरिंग व्यवसाय असल्यामुळे घरात लग्नाचे जवळपास तीनशे ते साडेतीनशे कपडे शिवण्यासाठी आले होते. मात्र, आगीत साडेतीनशे कपड्यासह घरातील अनेक वस्तू जळून खाक झाल्या. सदर आग लागल्याची माहिती कळताच डिग्रस बु. येथील माजी पंचायत समिती सदस्य, माजी सरपंच लक्ष्मण पर्‍हाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच गजानन छगन वाळ यांना १ हजार १00 रुपयांची आर्थिक मदत दिली. यावेळी तलाठी यांनी पंचनामे करून शासन दरबारी माहिती देऊन पाठपुरावा करण्याची माहिती दिली. यावेळी देऊळगाव राजा पंचायत समितीचे सभापती, सरपंच सैयद, उपसरपंच साहेबराव मघाडे, सदस्य भगवान पाटील, गुलाब पाटील, गजानन वाघ, माजी सरपंच संतोष पाटील, माजी पोलीस पाटील उद्धवराव पाटील, लक्ष्मण देव्हारे, नितीन लाड, बाबूराव पर्‍हाड, ग्रामसेवक लताताई आरबडे हजर होते. या आगीत छगन वाळ यांच्या घराचे व त्यांच्या मुलाच्या लग्नसराईनिमित्त शिवण्यासाठी आलेले कपडे जळून मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. या घटनेमुळे वाळ परिवारावर आर्थिक संकट कोसळले आहे. कांद्याच्या गंजीला आग; पाच लाखांचे नुकसानधोत्रानंदई : येथील भानुदास वामन बडधम यांच्या वाकी खु. शेत शिवारातील कांद्याची गंजी व साहित्य जळाल्याने पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना ७ मे रोजी १0 वाजता घडली. यांचे शेत गट क्र.३८ या शेतामध्ये कांद्याचे बियाणेला सकाळी गंजीला अचानक आग लागली. या आगीमध्ये स्प्रिंकलरचे पाइप, पेट्रोल पंप, वायर बंडल, ताडपत्र्या जळून खाक झाल्या. घटनेची माहिती मिळताच तलाठी जी.के.केवट यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी सरपंच रामदास डोईफोडे, गजानन गीते, पो.पा.झगन खिल्लारे यांनी शेतकर्‍याला झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.