शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

लग्न सोहळ्यांना परवानगी;  आवश्यक साहित्याची दुकाने मात्र बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 11:20 IST

Khamgaon News : लग्नसोहळ्यात अडचणी निर्माण होत असून या साहित्याविना लग्न करावे तरी क, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : कडक निर्बंधांच्या कालावधीत २५ जणांच्या उपस्थितीत लग्नकार्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र, लग्नासाठी लागणाऱ्या आवश्यक साहित्याची दुकाने बंद आहेत. त्यामुळे लग्नसोहळ्यात अडचणी निर्माण होत असून या साहित्याविना लग्न करावे तरी क, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदीसह काही निर्बंध लावण्यात आले आहेत. हे निर्बंध लावताना जिल्हा प्रशासनाने विसंगत निर्णय घेतले आहेत. त्याचा सामान्य नागरिकांना त्रास होत आहे. लॉकडाऊन काळात अल्प उपस्थितीत लग्नकार्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे लग्नसोहळ्यासाठी आवश्यक असणारे कपडे, सोने, बूट, चप्पल, भांडी यांची दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे नवरदेव - नवरीचे कपडे, सोन्या - चांदीचे आवश्यक दागिने, बूट, चप्पल, गरजेची भांडी यासह इतर साहित्य आणायचे कोठून ? असा यक्षप्रश्न नागरिकांसमोर उभा आहे. या आवश्यक साहित्याशिवाय लग्न पार पडू शकत नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे लग्नसोहळा आहे ते नागरिक त्रस्त झाले असून लॉकडाऊनच्या या उर्फाट्या नियमांबद्दल संताप व्यक्त करीत आहेत. निदान लग्नकार्यासाठी तरी हे साहित्य विकण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. तसे करता येत नसेल तर लग्नकार्यालाही परवानगी कशाला देता? अशीही संतप्त भावना अनेकांकडून व्यक्त होत आहे.

टॅग्स :khamgaonखामगावMarketबाजार