शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पेनटाकळी प्रकल्पाच्या चतुर्थ 'सुप्रमा'चा मार्ग झाला मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 12:23 IST

Pentakali project ४१६ कोटी ५९ लाख रुपयांच्या या सुप्रमास नियामक मंडळाकडूनही हिरवी झेंडी दिली जाण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: पेनटाकळी प्रकल्पाच्या चतुर्थ सुप्रमाचा मार्ग मोकळा झाला असून, १२ फेब्रुवारी रोजी झालेल्या तीन सदस्यीय उच्चस्तरीय समितीने या सुप्रमास मान्यता दिल्यामुळे आता थेट नियामक मंडळाच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. अल्पावधीतच ४१६ कोटी ५९ लाख रुपयांच्या या सुप्रमास नियामक मंडळाकडूनही हिरवी झेंडी दिली जाण्याची शक्यता आहे.जिल्ह्यातील १४ हजार २३२ हेक्टर क्षेत्र या प्रकल्पामुळे सिंचनाखाली आले असून, ६७.३५ दलघमी प्रकल्पाची साठवण क्षमता आहे. दरम्यान, चतुर्थ सुप्रमा मार्गी लागल्याने प्रकल्पांतर्गतची प्रलंबित भूसंपादनाची प्रकरणे मार्गी लागणार आहेत. यासोबतच धानमोड, मानमोड व पांढरदेव या गावांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला आहे. या व्यतिरिक्त प्रकल्पामुळे बाधित झालेल्या काही पुलांचेही बांधकाम करणे शक्य होणार आहे, तसेच गजरखेड फाटा-पेनटाकाळी-कासारखेड या रस्त्याच्या प्रश्न निकाली निघणार आहे. विशेष म्हणजे, या रस्त्याच्या मागणीसाठी यापूर्वी झालेल्या लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकांवर स्थानिकांनी बहिष्कार टाकण्याची भाषा केली होती. त्यामुळे स्थानिक लोकांसाठी हा एक मोठा जिव्हाळ्याचा प्रश्न होता. या व्यतिरिक्त ब्रह्मपुरी येथील कोल्हापुरी बंधाऱ्याचेही काम, त्यामुळे आगामी काळात पूर्ण करणे शक्य होणार आहे. या व्यतिरिक्त १४ हजार २३२ हेक्टर सिंचन क्षेत्रापैकी रखडलेले दोन हजार हेक्टरवरील सिंचनही मार्गी लागणार आहे, तसेच पेनटाकाळी प्रकल्पावरील कालव्यांचा प्रश्न मार्गी लागेल. मधल्या काळात ११ किमीचा मुख्य कालव्याला भगदाड पडल्यामुळे तो फुटला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. ते टाळण्याच्या दृष्टीनेही उपाययोजना करणे शक्य होणार आहे.

कॅबिनेटच्या मान्यतेची गरज नाहीपेनटाकाळी प्रकल्प हा फायद्यातील प्रकल्प (बेनिफिट कॉस्ट) अर्थात, खर्च कमी व लाभ जास्त असल्याने, जलसंपदा, नियोजन व अर्थ विभागाच्या सचिव स्तरावरील उच्चस्तरीय त्रिसदस्यी समितीने १२ फेब्रुवारी रोजी मुंबईत झालेल्या बैठकीस या चतुर्थ सुप्रमाला मान्यता दिली आहे. त्यामुळे आता कॅबिनेटमध्ये या सुप्रमाच्या मान्यतेचा प्रस्ताव ठेवण्याची गरज उरली नाही. त्याला आता थेट नियामक मंडळाची मान्यता घ्यावी लागणार आहे. त्यामुळे प्रकल्पांतर्गतचे उर्वरित कामे करणे सोपे जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प