शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाची काहिली; ‘ज्ञानगंगा’तील ५४ पाणवठे वन्यप्राण्यांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 13:54 IST

बुलडाणा : वन्यप्राण्यांची तहान भागवण्याकरिता वन्यजिव विभागाने ज्ञानगंगा अभयारण्यात ५४ पाणवठे उभारले आहेत.

- सोहम घाडगे लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : वन्यप्राण्यांची तहान भागवण्याकरिता वन्यजिव विभागाने ज्ञानगंगा अभयारण्यात ५४ पाणवठे उभारले आहेत. पाणवठ्यांमध्ये टँकरद्वारे पाणी टाकण्यात येत असून वन्यप्राण्यांना पाणवठ्यांचा आधार मिळाला आहे. वाढत्या उन्हाच्या पृष्ठभूमीवर वन्यप्राण्यांच्या अवस्थेबाबत 'लोकमत'ने रविवारी केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत ही वस्तूस्थिती आढळली.बुलडाण्याचे तापमान चाळीसपार पोहोचले आहे. थंड हवेचे ठिकाण अशी ओळख असलेले बुलडाणा शहर तापायला लागले आहे. उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वाढत्या तापमानामुळे घसा कोरडा पडत आहे. तहान भागविण्यासाठी नागरिक थंड पाणी, शितपेयांचा आधार घेत आहेत. उन्हामुळे जिवाची तगमग होत आहे. अशा परिस्थितीत शहरापासून १२ किलोमिटर अंतरावर असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यातील वन्यप्राण्यांची अवस्था कशी आहे याबाबत 'लोकमत' ने रविवारी प्रत्यक्ष पाहणी केली.दक्षिण देव्हारी, उत्तर देव्हारी, गोंधणखेड बिटमध्ये पाहणी करण्यात आली. वन्यजिव विभागाने वन्यप्राण्यांसाठी जागोजागी पाणवठे उभारल्याचे पाहणीत आढळून आले. तिसऱ्या दिवशी पाणवठ्यांमध्ये पाणी टाकण्यात येते. तीन टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा सुरु आहे. वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करण्याची गरज पडत नाही. जंगलातच त्यांच्यासाठी पाण्याची सोय करण्यात आली आहे. उन्हाच्या झळांमुळे सर्वत्र पाणीटंचाईची दाहकता वाढली आहे. अनेक गावांमधील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या पृष्ठभूमीवर वन्यप्राण्यांची अवस्था जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.ज्ञानगंगा अभयारण्याचा २० हजार हेक्टरवर विस्तार आहे. विविध प्रजातीच्या प्राणी व पक्ष्यांचा येथे अधिवास आहे. प्रामुख्याने अस्वल, बिबट, लांडगा, कोल्हा, तडस, रानडुक्कर, मोर, निलगाय, हरिण, माकड, रानमांजर हे प्राणी आढळतात. प्राण्यांच्या बारीक हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी १८ ट्रॅप कॅमेरे लावलेले आहेत. अभयारण्यात रस्ते तयार केले आहेत. त्यामुळे दळणवळण सहज झाले आहे. एका ठिकाणावरुन दुसºया ठिकाणी वेगात मदत पोहचवता येते. जंगलात आग लागल्यास तत्काळ घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य होते. रस्त्यांमुळे पर्यटकांना जंगल सफारीचा आनंद घेता येत आहे. ज्ञानगंगा अभयारण्याचे सौंदर्य व विविधता सर्वदूर पोहोचण्यास मदत झाली आहे. दिवसेंदिवस ज्ञानगंगा अभयारण्यास भेटी देणाºया पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे.सहा सोलर पंप बसवलेज्ञानगंगा अभयारण्यात ४ राऊंड असून ९ बीट आहेत. प्रत्येक बीटमध्ये चार ते पाच यानुसार एकुण ५४ पाणवठे उभारले आहेत. यापैकी २० पाणवठे इको फ्रेन्डली आहेत. वन्यप्राण्यांना यामधील पाणी पिणे सहज शक्य होते. जंगलाच्या आतील भागात व रस्त्याला लागूनही पाणवठे उभारले आहेत. अभयारण्यात सहा सोलर पंप बसवले आहे. त्याद्वारे पाणवठ्यांमध्ये पाणी पोहोचवले जाते. सोलर पंपचे पाणी कायम राहल्यास भविष्यात टँकरची गरज भासणार नाही.खाण्याच्या आशेने माकड रस्त्यावर ज्ञानगंगा अभयारण्यातून खामगावकडे जाणाºया रस्त्यावर माकड बसलेले दिसतात. प्रवासी वाहन थांबले की त्याच्याजवळ जातात. प्रवासी त्यांना खायला देतात. खायला मिळते या आशेमुळे माकड दररोज रस्त्यावर येऊन बसतात. नागरिकांनी माकडांना खायला काहीच देऊ नये. तसे आढळून आल्यास २५ हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो, असे आवाहन वन्यजिव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी मयूर सुरवसे यांनी केले आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाdnyanganga abhayaranyaज्ञानगंगा अभयारण्यwildlifeवन्यजीवforest departmentवनविभाग