शहरं
Join us  
Trending Stories
1
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
2
आता कोणत्या देशावर हल्ला करणार अमेरिका?; ८०० सैन्य अधिकाऱ्यांची अचानक बैठक, चर्चांना उधाण
3
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती -video
4
लाडक्या बहिणींना मिळणार १ लाखापर्यंत विशेष कर्ज; दीड हजारांच्या मानधनातून हप्ते वळते होणार
5
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीकडून 'ड्रामेबाज' पाकिस्तानी पंतप्रधानांची पोलखोल; कोण आहेत पेटल गहलोत?
6
Indian Idol 12 फेम सायली कांबळे लवकरच होणार आई, सोशल मीडियावर दिली खुशखबर!
7
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट
8
नवरात्री २०२५: अष्टमीला देवीसमोर घागरी फुंकण्याने अंगात संचार होतो? काय आहे ही प्रथा?
9
नवीन ट्रेंड्स फॉलो करणाऱ्यांनो सावधान! तुम्हीही ‘तो’ फोटो शेअर केला का ?; समोर आलं मोठं संकट
10
एक ओव्हर आणि मग गायब, फायनलपूर्वी हार्दिक पांड्याला झालं काय? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
11
Corona Virus : बापरे! कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन; 'ही' लक्षणं दिसताच सावधान
12
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
13
नवरात्री २०२५: कोकणस्थांकडे अष्टमीला असते उकडीच्या मुखवट्याची महालक्ष्मी; काय आहे वैशिष्ट्य?
14
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांची 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
15
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
16
विना इनक्रिमेंट १ लाखांपेक्षा अधिक वाढली सॅलरी; रुपया आणि डॉलर्सचा काय आहे याच्याशी संबंध?
17
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
18
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
19
ऑक्टोबरमध्ये शुक्र-शनीची युती; काही राशींना वाट्याला 'राजयोग' तर काहींना 'कर्माचे भोग'
20
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."

पाणी पुरवठा योजनेतील भ्रष्टाचाराची होणार चौकशी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 02:08 IST

बुलडाणा : जिल्ह्यातील १४२० गावातील पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचार झाला असून, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केली होती.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचा आदेश : वरिष्ठ अधिका-यांकडून होणार चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यातील १४२० गावातील पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचार झाला असून, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केली होती. याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले असून, चौकशीसाठी आयएएस अधिकाºयांची नियुक्ती केली आहे.जिल्ह्यातील १४२० गावातील पाणीपुरवठा योजनेतील कामांचे चावडी वाचन करून भ्रष्टाचार करणाºयांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा २६ जानेवारीनंतर भ्रष्टाचारी व्यक्तीविरुद्ध कार्यवाही न करणाºयाची हत्या करेल, असा इशारा माजी मंत्री सुबोध सावजी यांनी दिला होता, तसेच व्टिटरवर या प्रकरणाची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यावर मुख्यमंत्री कार्यालयाकडून याची दखल घेत या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे, तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याकरिता वरिष्ठ आयएएस अधिकाºयांची नेमणूक करण्यात येणार असून, सदर अधिकारी या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे उत्तर मुख्यमंत्री कार्यालयाद्वारे व्टिट करून देण्यात आले आहे.बुलडाणा जिल्ह्यातील १४२० गावामध्ये राष्टÑीय पेयजल योजना, महाजल योजना, ग्रामीण पाणी पुरवठा तात्पुरत्या पाणी पुरवठा योजना यांच्यावर व या योजनांच्या दुरुस्तीवर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाला; परंतु नळ योजनेतून पाणी मिळाले नाही. तर भरपावसाळ्यात ग्रामस्थांना पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहे. ढिसाळ नियोजनामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. जिल्ह्यातील १४२० गावांमध्ये कमीत कमी १ ते जास्तीत जास्त ३ नळ योजना झालेल्या आहेत व होत आहे; परंतु जिल्हाभर नळ पाणीपुरवठा योजनेमार्फत पिण्याच्या पाण्याचा कडकडीत ठणठणाट आहे. १४२० गावामध्ये नळयोजनेच्या काही ठिकाणी कामाची सुरुवात झाली, तर काही ठिकाणी अद्याप सुरुवातही झाली नाही. याबाबत माजी मंत्री सुबोध सावजी व शैलेश सावजी आवाज उठवित पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच याकरिता एका समितीचेही गठन करण्यात आले आहे. याची थेट मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली असून, चौकशी करण्यात येणार आहे. या चौकशीत काय उघड होते व कुणावर कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.पाण्यासाठी गेला अनेकांचा बळीजिल्ह्यातील १४२० गावात कोट्यवधीचा निधी खर्च होऊनही दरवर्षी महिला, पुरुष व जनावरांची जीवित हानी होते. आतापर्यंत पिण्याच्या पाण्याच्या कारणास्तव जवळपास १०० बळी गेलेले आहे. विहिरीमध्ये महिलांचा पडून मृत्यू होणे, पाणी आणताना पडल्याने मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. हे सर्व नागरिक शासनाच्या उदासीन धोरणाचे बळी ठरले आहेत; मात्र त्यानंतरही याकडे शासनाने गांभिर्याने लक्ष दिले नाही.मुख्यमंत्र्यांनी चौकशी सुरू केली आहे. ही चांगली बाब आहे. ज्या अधिकाºयांनी भ्रष्टाचार केला, त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत, त्यांच्याकडून रकमेची वसुली होत नाही. तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे. नागरिकांच्या घरात जोपर्यंत पाणी जात नाही, तोपर्यंत आम्ही लढा सुरूच ठेवणार आहे.- सुबोध सावजी, माजी मंत्री, बुलडाणा.