शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बुस्टरपंप जळाल्याने खामगाव शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 12:09 IST

Water supply of Khamgaon city गत तीन दिवसांपासून खामगाव शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वामननगरातील टाकीवरील बूस्टरपंप सोमवारी जळाला. त्यामुळे गत तीन दिवसांपासून खामगाव शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. वाढीव पाणीपुरवठा योजनेची प्रतीक्षा कायम असतानाच, दुसरीकडे कार्यान्वित असलेली योजनाही कुचकामी ठरत असल्याचे दिसून येते.खामगाव शहरातील पाणीसमस्या सोडविण्यासाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम गत ११ वर्षांपासून अतिशय संथगतीने सुरू आहे. गत साडेचार वर्षांच्या कालावधीत या योजनेला गती देण्यासाठी, तसेच पूर्णत्वास नेण्यासाठी पालिका प्रशासनाने कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत, तर काही ठिकाणी जुन्या पाइपलाइनवरच वाढीव पाणीपुरवठा योजनेंतर्गत नळांची जोडणी केली आहे. परिणामी, शहरात कार्यान्वित असलेल्या पाणीपुरवठा योजनेवरील ताण वाढला आहे.

पाणीपुरवठा पुन्हा लांबणीवर!वामननगरात टाकीवरील बूस्टरपंप जळाल्याने हिरानगर, तलाव रोड, चांदमारी, शेगावनाका, लक्ष्मी बाग परिसरातील पाणीपुरवठा खंडित झाला आहे. पाणीवाटपाचे रोटेशन बिघडल्याने नागरिकांना आता ११व्या दिवशीपर्यंत पाणीपुरवठ्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्रोतात मुबलक साठा असतानाही, नगरपालिका प्रशासन नियमित पाणी वितरण करण्यास कुठेतरी कमी पडत असल्याची चर्चा आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावwater transportजलवाहतूक