शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

वान धरणातील जलसाठा तीन दिवसात १२ टक्क्यांनी वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 14:29 IST

वारी हनुमान येथील हनुमान सागर धरणात बुधवार पर्यंत ३६.८४ जल साठा जमा झाला आहे.

- अझहर अलीसंग्रामपुर : अकोला, अमरावती, बुलढाणा या तीन जिल्ह्याच्या सिमेवर बांधलेले हनुमान सागर धरणाच्या जलसाठ्यात तीन दिवसापासुन  वाढ होत आहे. पावसाळा सुरू झाला तेव्हा पासुन धरणाच्या जलसाठ्यात वाढ होताना दिसत नव्हती. चार दिवस अगोदर या धरणात २५ टक्के जलसाठा उपलब्ध होता. त्यात आता झपाट्याने वाढ होताना दिसत असुन, तीन दिवसामध्ये १२ टक्क्यांनी जलसाठ्यात वाढ झाली. धरणामध्ये पाण्याची आवक वाढतीवर आहे. गत पाच दिवसापासुन पावसाच्या चांगल्याच सरी कोसळत असुन धरण परीसरातही वरूणराजाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे धरणाच्या जल साठ्यात वाढ होत आहे. वारी हनुमान येथील हनुमान सागर धरणात बुधवार पर्यंत ३६.८४ जल साठा जमा झाला आहे. या धरणातुन अकोला जिल्ह्यासह बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहर व खारपान पट्टयातील संग्रामपुर व जळगाव जा. तालुक्यातील १४० गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. वान नदी पात्रावर उभारण्यात आलेले हे धरण शेकडो गावातील लाखो लोकांची तहान भागवत आहे. यावर विज निर्मिती संच उभारण्यात आला असुन त्या संचाची क्षमता १ हजार ५०० किलो मेगावँट आहे. येथे एक हजार किलो मेगावँट विज निर्मिती करण्यात येत असुन अकोला जिल्ह्यातील हिवरखेड उप केंद्राला विज पुरवठा करण्यात येतो. तसेच अकोला जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीला या धरणातुन पाठाच्या माध्यमातुन पाणी मिळते. त्यामुळे वारी हनुमान येथील धरण या भागातील जनतेसाठी जिवनदायी ठरत आहे. धरणामधील जलसाठ्यात वाढ होत असल्याने या भागात पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी पाणि उपलब्ध होणार आहे. सातपुडा पर्वत रांगेतुन वाहत येत असलेली वान नदीचा उगम मध्यप्रदेशातुन असल्याने पर प्रांतात पाऊस पडल्यास या नदीला मोठ्या प्रमाणात पाणि येते सद्यास्थिती मध्यप्रदेशासह महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडत असल्याने हनुमान सागर धरणाच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. धरण परीसरात अशाच प्रकारे पाऊस पडला तर वारी येथील धरण लवकर भरण्याची शक्यता आहे. या धरणात सोमवार पासुन पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढत असुन बुधवारी सकाळ पर्यंत धरणामध्ये ३६.८४ टक्के जलसाठा जमा झाला असल्याची माहीती वान प्रकल्पाकडुन प्राप्त झाली आहे.

टॅग्स :Wan Projectवान प्रकल्पbuldhanaबुलडाणाAkolaअकोलाSangrampurसंग्रामपूर