शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

बुलडाणा जिल्ह्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठा पोहोचला १६३ दलघमीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 14:17 IST

प्रकल्पांमध्ये तब्बल १६३.३३ दलघमी पाणीसाठा निर्माण झाल्याने उन्हाळ््यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता निकाली निघाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात पावसाने यंदा दमदार हजेरी लावलेली असली तरी प्रकल्पांमध्ये मात्र अपेक्षीत जलसाठा न झाल्याने जिल्ह्यातील २५ लाख लोकसंख्येचा उन्हाळ््यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कसा सुटणार अशी चिंता लागून होती. मात्र दोन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये तब्बल १६३.३३ दलघमी पाणीसाठा निर्माण झाल्याने उन्हाळ््यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता निकाली निघाला आहे.त्यामुळे एक प्रकारे जिल्हासियांची उन्हाळ््यातील पिण्याच्या पाण्याची चिंता मिटल्यात जमा झाली आहे. वर्तमान स्थितीत जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ३१ टक्के पाणीसाठा उपल्बध झाला आहे. दरम्यान, दोन दिवस संततधार पाऊस झाल्यामुळे सध्या नदी, नाले, ओढ्यांना बऱ्यापैकी पुर जात असल्याने ९१ प्रकल्पांमध्ये जलसाठा आणखी वाढण्याची शक्यता आहे. खामगाव शहरास पाणीपुरवठा करणाºया ज्ञानगंगा प्रकल्पामध्येही ७० टक्के पाणीसाठा झाल्याने खामगावकरांना उन्हाळ््यात भेडसावणारी पाणीसमस्याही निकाली निघण्यात मदत झाली आहे.दीड दशकातील भीषण दुष्काळ अनुभवलेल्या बुलडाणा जिल्ह्यात संपलेल्या उन्हाळ््यात गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध करण्याची समस्या निर्माण झाली होती. तब्बल ३० योजनांसाठी पाणीआरक्षणच करता आले नव्हते. त्यामुळे यंदाच्या पावसाळ््यात प्रकल्पांमध्ये झालेल्या जलसाठ्यावर जिल्ह्यातील नागरिकांचे बारकाईने लक्ष होते. त्यामुळे प्रकल्पांमध्ये संततधार पावसामुळे झालेला जलसाठा पाहता जिल्हावासियांना एक प्रकारे दिलासा मिळाला आहे.

खडकपूर्णा प्रकल्पामध्येही आवकखडकपूर्णा प्रकल्पामध्येही पाण्याची आवक सुरू झाली असून प्रकल्पाच्या मृतसाठ्यामध्ये वाढ होत आहे. आज रोजी या प्रकल्पामध्ये १.१५ टीएमसीपर्यंत (३२.६३ दलघमी) हा मृतसाठा पोहोचला आहे. मजेशीर बाब म्हणजे बुलडाणा शहरास पाणीपुरवठा करणाºया येळगाव धरणात उपलब्ध असलेल्या जलसाठ्याच्या दुप्पट पाणीसाठा सध्या खडकपूर्णा प्रकल्पामध्ये आहे. दुसरीकडे उन्हाळ््यातील चार महिन्याचा विचार करता जिल्ह्याला जवळपास ४० दलघमी पाण्याची गरज असते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhadakpurna prakalpa/sant chokhamela damखडकपूर्णा प्रकल्प/ संत चोखामेळा सागर