शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार कामाचा मंत्रालय स्तरावर आढावा

By admin | Updated: March 24, 2016 02:51 IST

जलसंधारण मंत्र्यांची ग्वाही; बुलडाणा जिल्हाला मिळणार वाढीव निधी.

बुलडाणा : जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सुरू असलेली कामे राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत माघारलेली असून, सदर कामे प्राधान्यक्रमाने पूर्ण करण्यासाठी वाढीव निधी दिला जाईल. एवढेच नव्हे तर बुलडाणा जिल्ह्याच्या कामांसंदर्भात मंत्रालयीन स्तरावर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थित आढावा घेतला जाईल, अशी ग्वाही जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे पालवे यांनी दिली. आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाच्या अनुषंगाने त्यांनी बुधवारी विधानसभेत ही घोषणा केली. जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेच्या अनुषंगाने आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. सदर प्रश्न मांडताना आ. सपकाळ यांनी जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेची सद्यस्थिती विशद केली. जिल्हय़ाचा कृती आराखडा निश्‍चित करून त्यामध्ये २५ हजार ६३१ कामांचा समावेश आहे. त्यासाठी ४८९ कोटी २६ लाख रुपये विशेष तरतुदीची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात मात्र बुलडाणा जिल्ह्यास आजमितीस अल्प तरतूद प्राप्त झालेली आहे. त्यापैकी ७0 कोटी ५१ लाख तरतूद प्रत्यक्षात खर्च झाली असून, ५६ कोटी ९८ लाख रुपयांच्या निधीतून मार्चअखेरीस होणार्‍या कामाचे नियोजन पूर्ण करण्यात आलेले आहे. प्रस्तावित करण्यात आलेल्या २५ हजार ६३१ कामांपैकी फक्त ५ हजार १८ कामे पूर्ण झाली आहेत. या प्रश्नावरील चर्चेत आमदार बोंद्रे, डॉ. शशिकांत खेडेकर, अँड. आकाश फुंडकर यांनीसुद्धा सक्रिय सहभाग घेत जलयुक्त शिवार योजनेबाबत आ. सपकाळ यांनी मांडलेल्या वस्तुस्थितीस दुजोरा दिला. दरम्यान सदर प्रश्नाच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेस उत्तर देताना जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांनी जलयुक्त शिवार योजनेचा आराखडा तयार करताना शिफारस करण्यात आलेल्या अनावश्यक व बोगस कामांची चौकशीसुद्धा करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. आ. सपकाळ यांनी केलेल्या सूचनेनुसार योजनेतील कामांमध्ये सुसूत्रता, लोकसहभाग, पारदर्शकता, गतिमानता वाढविण्यासाठी धोरण निश्‍चित करण्यात येईल व बुलडाणा जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत मंत्रालय पातळीवर लवकरच आढावा घेण्यात येईल, अशा त्या म्हणाल्या.