शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

पाणीटंचाई: विकतच्या पाण्यावर भागवावी लागते तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 14:15 IST

दररोज २० ते २५ रुपये मोजून खाजगी पाणी फिल्टर प्लांट धारकांकडून कॅन विकत घेऊन आपली तहान भागवतात.

बिबी:  बिबी येथे पाणीपुरवठा होणाºया जलाशयात पुरेसा जलसाठा असून सुद्धा योग्य नियोजन नसल्यामुळे बीबी वासियांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. वापरासाठी टँकरद्वारे पाणी विकत घेतात. दररोज २० ते २५ रुपये मोजून खाजगी पाणी फिल्टर प्लांट धारकांकडून कॅन विकत घेऊन आपली तहान भागवतात.गावात मोलमजुरी करणाºयांची संख्या जास्त आहे. त्यांना दररोज एवढे पैसे मोजून पाणी घेणे परवडत नाही. ते सर्वजण गावच्या पुर्वेस असणाºया मशानभूमी जवळील हातपंपाच्या पाण्याने आपली गरज भागवतात. परंतु तो हातपंप चार पाच दिवसापासून नादुरूस्त आहे. त्यामुळे गावकºयांना पाणीच मिळेनासे झाले आहे. नळाद्वारे गावाला पाणी पुरवठा होतो, तो २० दिवसाआड तर कधी एक-एक महिन्याच्या अंतराने. पाणी पुरवठा करणाºया विहिरीला गावकºयांना पुरेल एवढा पाणी साठा उपलब्ध आहे; परंतु नियोजना अभावी पाणी समस्या भेडसावत आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे पाणी रात्री-बेरात्रीच्या वेळेस सोडल्या जाते. विहिरीतील पाणी गावात बांधलेल्या पाण्याच्या टाकीत न सोडता थेट विहिरीतून नळाला सोडले जाते. त्यामुळे पाण्याच्या टाक्या शोभेच्या वस्तू बनलेल्या आहेत. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाच्या नियोजनाचा अभाव कारणीभूत असून लोकांना नहाक त्रास सहन करावा लागत आहे.  आरोग्य धोक्यात फिल्टर प्लांटच्या टाकाऊ पाण्याचा वापरही काही गोरगरीब मजूर करीत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकांना स्वच्छ व मुबलक पाण्याचा नियमित पुरवठा व्हावा, अशी अपेक्षा गोरगरीब जनते कडून केली जात आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी ग्रामपंचायतला  निवेदन दिले आहे. या निवेदनावर गणेश आटोळे, लक्ष्मण लोहारे, सोहेल खान, योगेश लोंढे, संतोष गाढवे, वैभव महाजन, आकाश जाधव, प्रकाश वाकळे व राहुल वानखेडे यांच्या सह्या आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाwater scarcityपाणी टंचाई