शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

बुलडाणा जिल्ह्यात पाणीटंचाईची चाहूल;  विहीर अधिग्रहणास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 11:39 IST

Water scarcity in Buldana district नांदुरा व शेगाव तालुक्यातील पाच गावांत विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यात पाणीटंचाई जाणवण्यास प्रारंभ झाला असून, नांदुरा व शेगाव तालुक्यातील पाच गावांत विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या वर्षीचा जिल्ह्याचा पाणीटंचाईचा कृती आराखडा हा १६ कोटी ३ लाख ३२ हजार रुपयांचा आहे. दरम्यान, यंदा जिल्ह्यातील ६८७ गावांत पाणीटंचाई जाणवण्याची भीती आहे. त्यानुषंगाने जिल्हा प्रशासनाने ९५६ उपाययोजनांची तरतूद जिल्हा प्रशासनाने केली आहे. यामध्ये विंधन विहिरी, कूपनलिका घेण्यासाठी १ कोटी २६ लाख ५० हजार रुपयांची आराखड्यात तरतूद करण्यात आली असून २३० उपाययोजना त्यातून करण्यात येणार आहेत. ६१ नळ योजनांच्या दुरुस्तीसाठी ३ कोटी ५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तात्पुरत्या पूरक नळ योजनांसाठी दोन कोटी १० लाख रुपये खर्च अपेक्षित असून, २१ गावांतील योजनांची दुरुस्ती करावी लागणार आहे.याव्यतिरिक्त ५३८ गावांत पाणीटंचाई निवारणासाठी ५५९ विहिरी अधिग्रहित कराव्या लागणार आहेत. त्यासाठी २ कोटी ७५ लाख ८२ हजार रुपयांचा खर्च करावा लागणार आहे.

दोन तालुक्यांत आतापासूनच टंचाईखारपाण पट्ट्यातील दोन तालुक्यांत पाणीटंचाईच्या झळा बसण्यास प्रारंभ झाला असून, नांदुरा तालुक्यात त्यामुळे नारखेड, हिंगणा भोटा, भोरवंड आणि शेगाव तालुक्यात चिंचखेड आणि जानोरी येथे त्यामुळे विहिरी अधिग्रहित कराव्या लागल्या आहेत.

८२ गावांत टँकरची गरजयावर्षी ६८७ गावांत पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता असून, ८२ गावांना ८४ टँकरने पाणीपुरवठा करावा लागू शकतो. त्यादृष्टीने ६ कोटी ८४ लाख रुपयांचे पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यात नियोजन करण्यात आले आहे. तूर्तास जिल्ह्यात एकही पाण्याचे टँकर सुरू नसल्याचे टंचाई निवारण विभागातील सूत्रांनी स्पष्ट केले. दरम्यान, २०१८-२०१९ या वर्षी जिल्ह्यात तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई होती. त्या तुलनेत यंदा टंचाईचे प्रमाण कमी असल्याचे जाणवत आहे, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाwater scarcityपाणी टंचाई