शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

बुलडाणा जिल्ह्यातील ६५ गावातील पाणीनमुने दुषीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 12:49 IST

४२ टक्के उद्भवामध्ये नायट्रेटसह आर्यन व अन्य मुलद्रव्यांचे प्रमाण तुलनेने अधिक आढळून आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यातील सुमारे सात हजार पाणी उद्भवापैकी निम्म्या उद्भवातील पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यातील ४२ टक्के उद्भवामध्ये नायट्रेटसह आर्यन व अन्य मुलद्रव्यांचे प्रमाण तुलनेने अधिक आढळून आले आहे. त्यातच ६५ गावातील पाणी नमुने हे दुषीत आढळून आले आहे.पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या सहकार्याने भुजल सर्व्हेक्षण विभागाने जिल्ह्यातील सहा हजार ८४१ पाण्याच्या उद्भवापैकी तीन हजार ४४३ उद्भवातील पाण्याचे नमुने गोळा केले होते. त्यापैकी प्रत्यक्षात ३, ६१० पाणी नमुन्यांची रासायनिक तपासणी भुजल सर्व्हेक्षण विभागाने केली तेव्हा यापैकी १,४५३ अर्थात ४२ टक्के पाणी नमुने पिण्याच्या दृष्टीने अयोग्य असल्याचा निष्कर्ष निघाला आहे. विशेष म्हणजे या पाण्यात आयर्न व नायट्रेटचे प्रमाण अधिक आढळून आले आहे. घातक फ्लोराईडचे प्रमाण मात्र या पाण्यात नसल्याचे स्पष्ट झाले आहे.प्रामुख्याने पाण्याची अनुजैविक आणि रासायनिक तपासणी दरवर्षी मान्सूनपूर्व व मान्सून पश्चात करण्यात येत असते. त्यानुषंगाने बुलडाणा जिल्ह्यात नागरिक ज्या पाणी उद्भवातून पाणी दैनंदिन गरजांसाठी वापरतात तेथील पाण्याचे नमुने पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने संकलीत केले होते. भुजल सर्वेक्षण विभागाच्या माध्यमातून त्यांची तपासणी करण्यात आली असता त्यात ४२ टक्के पाणी नमुने हे अनफीट अर्थात पिण्यास अयोग्य असल्याचे समोर आले होते.

या तालुक्यात आयर्न, नायट्रेटचे प्रमाण अधिकजळगाव जामोद व संग्रामपुर तालुक्यातील १७४ आणि १७७, चिखली तालुक्यातील २०० तर बुलडाणा तालुक्यातील १२९ ठिकाणच्या पाणी नमुन्यामध्ये नायट्रेटसह आयर्नचे तथा अन्य मुलद्रव्याचे प्रमाण हे निर्धारीत निकषापेक्षा अधिक आढळून आले आहे. त्यामुळे एकूण तपासण्यात आलेल्या पाणी नमुन्यांपैकी ४२ टक्के पाणी नमुने हे पिण्यास अयोग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी आता ग्रामीण भागातील या पाण्याच्या उद्भवांचे शुद्धीकरण करणे गरजेचे झाले आहे.नऊ टक्के ग्रामपंचायतीमधील पाणी दुषीतआरोग्य विभागाच्या माध्यमातूनही तपासण्यास आलेल्या पाणी नमुन्यांची शहानिशा करण्यात आली असता नऊ टक्के ग्रामपंचायतीमधील पाणी हे दुषीत आढळून आले आहे. यात प्रामुख्याने एकट्या मोताळा तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींचा समावेश असून बुलडाणा तालुक्यातील आठ, मेहकर आणि नांदुरा तालुक्यातील सात गावांचा यात समावेश आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाWaterपाणी