शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

विहिरींची तपासणार पाणी पातळी!

By admin | Updated: January 31, 2017 02:55 IST

एप्रिल महिन्यापासून सुरुवात : जलसुरक्षकांवर कामाचा भार वाढणार!

नीलेश शहाकारबुलडाणा, दि. ३0- भूवैज्ञानिक विभागाच्यावतीने दरवर्षी ५७ पाणलोट क्षेत्रामध्ये १६७ निरीक्षण विहिरींमध्ये पाणी तपासणी करण्यात येते. यंदा जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता, १३ तालुक्यात ११४६ निरीक्षण विहिरींची नव्याने निवड करण्यात आली आहे. यातील पाणी पातळीची नियमित तपासणी करावी लागणार असल्यामुळे जलसुरक्षकांवर कामाचा भार वाढणार आहे.जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोणत्या ठिकाणचे पाणी नमुने हे दूषित आहेत, गुणवत्तापूर्ण आहेत, याचा अभ्यास करून जिल्ह्याचे पेयजलाबाबतचे धोरण ठरवण्याच्या दृष्टीने भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडून जिल्ह्यातील विविध गावांतील निरीक्षण विहिरीमधून पाणी नमुन्यांची रासायनिक तपासणी व पाणीपातळी मोजमाप करण्यात येते. यंदा १३ तालुक्यात ११४६ निरीक्षण विहिरी नव्याने निर्धारित करण्यात आल्या आहेत.संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता, १ एप्रिलपासून जिल्ह्यातील ८६९ ग्रामपंचायती अंतर्गत येणार्‍या १४२0 गावांमधील नव्या ११४६ निरीक्षण विहिरींच्या पाणी पातळीचे आकडे जलसुरक्षकांकडून गोळा केले जाणार आहेत.जलसुरक्षाकडून पाणी पातळीचे एकक व रासायनिक नमुने घेऊन जिल्ह्यातील एक विभागीय व पाच उपविभागीय अशा सहा प्रयोगशाळांमध्ये तपासणी केली जाईल.यातून संभाव्य पाणीटंचाई व दूषित पाणी नमुन्यावर उपाययोजना करता येईल. कामाचा भार वाढणार!एका पाणलोट क्षेत्रात दोन किंवा तीन निरीक्षण विहिरी याप्रमाणे जिल्ह्यात १६७ विहिरींतील पाण्याची याआधी जलसुरक्षकांकडून तपासणी केली जात होती. यावर्षी जिल्ह्यात नव्याने ११४६ निरीक्षण विहिरी निर्धारित करण्यात आल्या. जिल्ह्यात ८६९ ग्रामपंचायती असून, तेवढेच जलसुरक्षक कार्यरत आहेत. त्यांना आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा पाणी तपासणी करावी लागणार असल्यामुळे त्यांच्यावर कामाचा भार वाढणार आहे.मोबदला मिळणार!पाणी तपासणीचे काम यापूर्वी आरोग्य विभागाकडून केले जात असे. ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत जलसुरक्षकांच्या मानधनाबाबत अनेक समस्या पुढे आल्या होत्या. आता पाणी तपासणी मोहीम ग्रामीण पाणीपुरवठा व भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडून राबविण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक जलसुरक्षकाला मोजपट्टी, नोंदणी वही व कामाचा मोबदला देण्यात येणार आहे. मोबाइल अँपचा होईल वापरकामात सातत्य व गती देण्यासाठी जिल्ह्यात पहिल्यादाच पाणी तपासणीचे आकडे जलसुरक्षकांकडून भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा विशिष्ट मोबाइल अँपद्वारे मागविणार असून, विभागाकडून ते दररोज शासनाकडे अद्ययावत करण्यात येणार आहे.