शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मलकापूर तालुक्यात ३३ गावांवर पाणीटंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:49 IST

मलकापूर: येणार्‍या काळात मलकापूर तालुक्यातील ३३ गावात पाणी  टंचाईचे सावट आहे. त्यासाठी ऑक्टोबर १७ ते जून १८ या दरम्यान  पं.स. प्रशासनाने तीन टप्प्यात त्यावर मात करण्यासाठीचे नियोजन करीत  उपाययोजना आखल्याची माहिती असून, बर्‍याच गावांची भिस्त नळगंगा  धरणाच्या जलसाठय़ावर निर्भर असल्याच सूत्रांनी सांगितले आहे. 

ठळक मुद्देतीन टप्प्यात नियोजननळगंगा धरणावर भिस्त

हनुमान जगताप। लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर: येणार्‍या काळात मलकापूर तालुक्यातील ३३ गावात पाणी  टंचाईचे सावट आहे. त्यासाठी ऑक्टोबर १७ ते जून १८ या दरम्यान  पं.स. प्रशासनाने तीन टप्प्यात त्यावर मात करण्यासाठीचे नियोजन करीत  उपाययोजना आखल्याची माहिती असून, बर्‍याच गावांची भिस्त नळगंगा  धरणाच्या जलसाठय़ावर निर्भर असल्याच सूत्रांनी सांगितले आहे. मलकापूर तालुक्यातील ६६ पैकी ३३ गावात म्हणजे ५0 टक्के पाणी  टंचाईचे संकट येण्याची शक्यता आहे. त्यात ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान हरणखेड विहीर अधिग्रहित  करण्यात आली असून, वझीरबादचा प्रस्ताव प्राप्त झाल्याने लवकरच  त्यावर मंजुरी होईल, असे सूत्रांनी पहिल्या टप्प्यात रणगाव, शिवणी,  भालेगाव, निंबोळा, वाघोळा, चिंचोल, भानगुरा, वडजी, वरखेड,  कुंडखुर्द, तांदुळवाडी, झोडगा, वाघुड अशा ११ गावात विंधन विहिरीचे  प्रस्ताव आहेत. यापैकी दोन गावात खासगी विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव  कृती आराखड्यात आहेत.तिसर्‍या टप्प्यात एप्रिल ते जून १८ दरम्यानच्या कालावधीत वाकोडी,  मलकापूर ग्रामीण, खामखेड, पिंपळखुटा महादेव,  गौलखेड, निंबाळी,  कुंड खुर्द, हरसोडा, अशा ८ गावात विंधन विहिरींचे प्रस्ताव आहेत. यापैकी वाकोडी मलकापूर ग्रामीण आदी मोठय़ा गावात ४ टँकरचे प्रस् ताव आहेत. त्यांची भिस्त नळगंगा धरणाच्या जलसाठय़ावर असून, तो  कमी झाल्यास टँकर वाढू शकतात. याशिवाय पिंपळखुटा, लासुरा,  वरखेड, पिंपळखुटा बु., कुंड बु., तांदुळवाडी, वाघुड, येथेही खासगी  विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव आहेत, तर पिंपळखुटा बु., निमखेड अशा  २ गावांसाठी टँकर प्रस्तावित आहेत. सद्यस्थितीत उपाय योजनाविषयी नमूद करावयाचे झाल्यास हरणखेड  गौलखेड येथे योजना सुरू आहेत, तर वझीराबाद, बहापुरा, पिंपळखुटा  महादेव या ठिकाणचे प्रस्ताव मंजुरीच्या मार्गावर आहेत. एकंदरीत तालु क्यातील ६६ पैकी ३३ गावावर पाणी टंचाईचे सावट असून, त्यावर मात  करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसल्याचे दिसत.

तालुक्यात मोठय़ा संख्येत गावे ही नळगंगा धरण व हतनूर धरणाच्या  बॅकवॉटर यावर अवलंबून आहेत. ‘त्या’ गावासह टंचाईग्रस्त गावासाठी  काय? उपाययोजना करायच्या त्याविषयी आम्ही प्रयत्नशील आहोत.  आमच्या प्रयत्नांना नक्की यश येईल, असा आम्हाला विश्‍वास आहे.-डॉ.एस.टी. चव्हाण, गटविकास अधिकारी, मलकापूर 

टॅग्स :nalganga damनळगंगा धरणbuldhanaबुलडाणा