शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील धरणे तहानलेलीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 03:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: निम्म्याच्यावर पावसाळा संपला असून, अजूनही जिल्ह्यातील विविध प्रकल्पातील जलसाठ्यात कोणतीही विशेष वाढ झालेली नाही. बहुतांश धरणे अद्याप तहानलेलीच  आहेत. नळयोजनांना आवश्यक एवढा जलसाठाही धरणांमध्ये झालेला नाही. त्यामुळे विविध गावांवर पाणीटंचाईचे सावट निर्माण झालेले आहे.दमदार पावसाअभावी जलसाठ्यांनी तळ गाठला असून, जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. हवामान खात्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: निम्म्याच्यावर पावसाळा संपला असून, अजूनही जिल्ह्यातील विविध प्रकल्पातील जलसाठ्यात कोणतीही विशेष वाढ झालेली नाही. बहुतांश धरणे अद्याप तहानलेलीच  आहेत. नळयोजनांना आवश्यक एवढा जलसाठाही धरणांमध्ये झालेला नाही. त्यामुळे विविध गावांवर पाणीटंचाईचे सावट निर्माण झालेले आहे.दमदार पावसाअभावी जलसाठ्यांनी तळ गाठला असून, जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. हवामान खात्याने यावर्षी जून, जुलैमध्ये दमदार पावसाचा अंदाज वर्तविलाहोता; मात्र जिल्ह्यात हा अंदाज पूर्णपणे खोटा ठरला. जिल्ह्यात काही भागात लवकर तर काही भागात उशिरा हजेरी लावणाºया पावसाने नंतरच्या काळात खेळ चालविला आहे. चार-पाच दिवसांच्या अंतराने पाऊस येतो; पण पावसात जोर दिसत नाही. कुठे भुरभुरी तर कुठे रिमझिम स्वरूपाचा पाऊस बरसतो. अद्याप जिल्ह्यात मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठ्यातही वाढ झालेली नसून, त्यात अल्प जलसाठा शिल्लक आहे. तर बरीच धरणे अद्याप कोरडी आहेत. दमदार पावसाअभावी विहिरींची जलपातळी कमी झालेली आहे. यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे.खामगाववर पाणीटंचाईचे सावटखामगाव शहराला पाणीपुरवठा करणाºया गेरू माटरगाव येथील ज्ञानगंगा धरणात केवळ २३ टक्के जलसाठा शिल्लक असून, शहरावर पाणीटंचाईचे सावट आहे. गेरु माटरगावधरणक्षेत्राला अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पावसाअभावी यावर्षी धरणाच्या जलपातळीत वाढ झालेली नाही. अर्ध्याच्यावर पावसाळा उलटून गेला आहे; मात्र धरणातील जलपातळी वाढलेली नाही. शहराची दररोजची पाण्याची गरज पाहता काही महिने पुरेल इतकाच जलसाठा धरणात आहे. सध्या शहराचा पाणीपुरवठा सातव्या दिवसावर पोहचलाआहे. आणखी काही दिवसात धरणाच्या जलसाठ्यात वाढ न झाल्यास शहरावर पाणीटंचाईचे सावट निर्माण होऊ शकते. संभाव्य धोका ओळखून पाण्याचा जपून वापर करणेआवश्यक आहे.