लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : घाटपुरी रोडवरील डम्पिंग ग्राउंडवर कचरा जाळणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात आली आहे. मात्र, गत काही दिवसांपासून डम्पिंग ग्राउंडवर पुन्हा कचरा पेटविला जात आहे. त्यामुळे नगरपालिकेने या ठिकाणी नेमणूक केलेले कामगार नेमके करतात तरी काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.हरित लवादाने उघड्यावर कचरा टाकणे आणि कचरा पेटविण्यावर बंदी घातली आहे. मात्र, असे असतानाही खामगाव शहरातील डम्पिंग ग्राउंडवर सातत्याने कचरा पेटविला जात आहे. डम्पिंग ग्राउंडवरील कचरा पेटविणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी नोव्हेंबर २०२० मध्ये येथे दोन वॉर्ड प्युनची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच कचरा जाळण्याच्या प्रक्रियेला स्थानिकांचा होत असलेला विरोध लक्षात घेता, अग्निशमन विभागाच्या बंबाद्वारे कचरा विझविला जात होता. दरम्यान, किसननगर, गोपाळनगर भागातील नागरिकांचा विरोध लक्षा घेता, या ठिकाणी दोन वॉर्ड प्युनची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही गत आठवड्यात दोन वेळा डम्पिंग ग्राउंडवर कचरा जाळण्यात आला. तसेच या आठवड्यातही कचरा जाळण्यात आल्याचा प्रकार पुढे आला. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये पुन्हा पालिका प्रशासनाविरोधात नाराजीचा सूर उमटत आहे.
खामगावात डम्पिंग ग्राउंडवर कचरा जाळणे सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 17:35 IST
Khamgaon Municipal Counsil नगरपालिकेने या ठिकाणी नेमणूक केलेले कामगार नेमके करतात तरी काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
खामगावात डम्पिंग ग्राउंडवर कचरा जाळणे सुरूच
ठळक मुद्देहरित लवादाने उघड्यावर कचरा टाकणे आणि कचरा पेटविण्यावर बंदी घातली आहेकचरा पेटविणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी दोन वॉर्ड प्युनची नियुक्ती करण्यात आली होती.