शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

बारावी निकालात पश्चिम वऱ्हाडात वाशिम अव्वल; बुलढाणा जिल्हा दुसऱ्या स्थानी

By ब्रह्मानंद जाधव | Updated: May 25, 2023 15:08 IST

बुलढाणा जिल्हा दुसऱ्या स्थानी : विभागाचा ९२.७५ टक्के निकाल

बुलढाणा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल २५ मे रोजी जाहीर करण्यात आला आहे. अमरावती विभागाचा एकूण निकाल ९२.७५ टक्के लागला असून, पश्चिम वऱ्हाडातून वाशिम जिल्हा अव्वल राहिला आहे. बुलढाणा जिल्हा दुसऱ्या स्थानी आहे.

फेब्रुवारी २०२३ मध्ये झालेल्या इयत्ता बारावी परीक्षेच्या निकालाची विद्यार्थ्यांना उत्सुकता लागली होती. दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून २५ मे रोजी बारावी परीक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यामध्ये अमरावती विभागाचा ९२.५७ टक्के निकाल लागला आहे. पश्चिम वऱ्हाडात वाशिम जिल्हा टॉपर असून, वाशिम जिल्ह्याचा निकाल ९५.४५ टक्के लागला आहे. वऱ्हाडातून दुसऱ्या स्थानी असलेल्या बुलढाणा जिल्ह्याचा निकाल ९३.६९ टक्के लागला आहे. त्यानंतर अकाेला जिल्ह्याचा निकाल ९३.११ टक्के लागला आहे. अमरावती विभागातून १ लाख ३८ हजार ५६४ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यामध्ये मुलींची संख्या ६४ हजार ३६४ आणि मुलांची संख्या ७४ हजार २०० होती. यातील १ लाख २८ हजार ५२१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुली ६१ हजार ४२ व मुले ६७ हजार ४७९ आहेत. पश्चिम वऱ्हाडात वाशिम जिल्ह्यात बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे.पश्चिम वऱ्हाडातील चित्र (टक्के)

जिल्हा मुले मुली एकूणबुलढाणा ९२.५० ९५.१७ ९३.६९वाशिम ९४.५२ ९६.७५ ९५.४५अकोला ९१.०१ ९५.५० ९३.११

पश्चिम वऱ्हाडातील ७० हजार विद्यार्थी उत्तीर्णपश्चिम वऱ्हाडातील अकोला, बुलढाणा व वाशिम या तीन जिल्ह्यातून ७४ हजार ७७६ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी ७० हजार २४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वाशिम जिल्ह्यातून १७ हजार ५८०, बुलढाणा ३० हजार २८५ आणि अकोला जिल्ह्यातील २२ हजार ३८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

असा आहे शाखानिहाय निकालअमरावती विभागाच्या बारावी परीक्षेच्या शाखानिहाय निकालावर प्रकाश टाकला असता विज्ञान शाखेचा सर्वाधिक निकाल लागल्याचे दिसून येते. विज्ञान शाखेचा निकाल ९८.१४ टक्के, कला ८६.६४ टक्के आणि वाणिज्य शाखेचा ९३.१५ टक्के निकाल लागला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाHSC / 12th Exam12वी परीक्षाHSC Exam Resultबारावी निकाल