शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

बुलडाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 11:54 IST

Warning of unseasonal rains in Buldana district १७ आणि १८ तारखेला अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात येत्या १७ आणि १८ तारखेला अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता जिल्हा कृषी हवामान केंद्राच्या वतीने नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राचा हवाला देत व्यक्त करण्यात आली आहे. विदर्भात प्रामुख्याने हा अवकाळी पाऊस पडणार असून, मध्यम ते हलक्या स्वरूपाचा हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे हा पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फार जोरदार नसला, तरी मध्यम ते हलक्या स्वरूपाच हा पाऊस राहणार असल्याचे जिल्हा कृषी हवामान केद्रातील तज्ज्ञ मनेश यदुलवार यांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी त्यांची शेतात परिपक्व झालेली तूर काढली असेल, तर ती सुरक्षीत स्थळी हलवावी, तसेच लवकर पेरलेला हरभरा काढणीस आला असल्यास किंवा काढला असल्यास तोही पावसापासूनच्या बचावासाठी सुरक्षित स्थळी हलविण्यात यावा, असे आवाहन जिल्हा कृषी हवामान केंद्राने केले आहे. दुसरीकडे हवामान खात्याने दोन दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला असला, तरी १४ फेब्रुवारी रोजीही बुलडाणा जिल्ह्यात ढगाळ वातावरण दिसून आले. दरम्यान बुलडाण्यात जिल्हा कृषी हवामान केंद्र गेल्या दोन वर्षांपासून सुरू झाले असून, बुलडाणा जिल्ह्यातील जवळपास १८ हजार शेतकऱ्यांना आता नियमित स्वरूपात आठवड्यातून  दोन दिवस हवामानाचा अंदाज व पिकांसंदर्भात एसएमएसद्वारे मार्गदर्शन करण्यात येते.अवकाळी पावसाची शक्यता पाहता शेतकऱ्यानी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाRainपाऊस